१६ कुलदेवतांचे स्तोत्र - समाजाचा इतिहास
- dileepbw
- Sep 17, 2022
- 1 min read
"संस्कारवाणी,मुंबई" या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या सांस्कृतिक संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरीत केलेल्या "संस्कारधारा" या धार्मिक साहित्यामध्ये पान नंबर ३२ वर लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील सर्व १६ "कुलदेवतांचे स्तोत्र" छापलेले आहे.
ते समस्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांनी काळजीपूर्वक वाचावे.
कारण त्याच्यात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा सुमारे १००० वर्षांचा इतिहास दडलेला आहे.
सर्वांच्या माहितीसाठी हे "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील सर्व १६ कुलदेवतांचे स्तोत्र" येथे प्रसृत करीत आहे. त्यानंतर आपण "कुलदेवतांचे महत्व" यावर अभ्यास करणार आहोत.
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील सर्व १६ कुलदेवतांचे स्तोत्र"
निझर वेळते भवानी माता,हिंगणे खम्बिका देवी,
धनाई पुनाई निजामपुरे,जोगशेलु जोगेश्वरी /
बेटावदे महाम्बादेवी,म्हाळसादेवी जोगेश्वरी,
उटावद सुलाई फुलाई,शिंदखेडे आशापुरी /
साळवे येडकाई,मांडळेस जोगेश्वरी,
कापडणेस अन्नपूर्णा,एकविरा धुळेस /
अंबोडेस अंबिकामाते,शारजा बारजा बहाळेस,
आडगावी मनुदेवी,जगदंबा पाटणेस,
साडेतीन पीठे सप्तशृंगी /
एतानी लाडवाणी कुलस्वामिनी नामे सायं प्रातः पठेन्नर,
सप्तजन्म कृतं पापं स्मरेणेन विनश्यति /
इति श्री लाड वाणी श्री कुलस्वामिनी स्तोत्रम संपूर्णम //
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या समस्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी या स्तोत्रात वर्णन केलेल्या सर्व १६ कुलदेवतांची "पीठे(वसतीस्थाने)" व त्यांचे अक्षांश-रेखांश(GPS coordinates) इंटरनेटवर शोधून काढावे.
त्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे जोडणारी "रेषा" हा "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजा" चा "गुजरात ते महाराष्ट्र" असा गेल्या १००० वर्षातील स्थलांतराचा मार्ग आहे हे सहज लक्षात येईल.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments