Aedes
- Aug 6, 2021
- 2 min read
"Aedes बाबा हमसे दूर रहो"
महापूर आपत्ती ग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनासाठी "BJMC-1973 बॅच" ने केलेल्या भरघोस मदतीबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार !
महापूराची "आपत्ती" संपली.पण आता डेंगीची "विपत्ती" सुरू झाली आहे.महाड शहरात सर्वत्र साठलेले पाणी पाहिले व तेव्हाच शंकेची पाल मनात चुकचुकली होती.
माणसांना "बेघर" करून सोडणार्या निसर्गाने "Aedes" बाबांना मात्र मोठाच आसरा व प्रजनन केंद्र प्राप्त करून दिले आहे.पुण्याने पाठविलेल्या मदतीच्या आधारावर जनकल्याण रक्तपेढी,महाडने "उसने अवसान" आणले खरे ! त्यातून थॅलेसेमिया व डायलेसिसवाल्यांची तत्क्षणी
सोय झाली खरी ! पण दुसरा दिवस उजाडला तोच मुळी रक्ताची मागणी करणार्या रूग्णांच्या गर्दीने ! मागणी पण कशाची तर "प्लेटलेट्स" ची ! रुग्ण डेंगी" चा ! महाडकरांची पण कमालच ! रक्तदात्यांची झुंडच्या झुंड रक्तपेढीत येऊन उभी ठाकली. हा सूर्य व हा जयद्रथ ! जनकल्याण रक्तपेढी, महाडने कंबर कसली.सर्वांचे रक्तदान करून घेतले. तातडीने जागेवरच "प्लेटलेट्स" तयार केल्या व रूग्णाला "प्लेटलेट्स" च्या सहा युनिटस् देऊन वाचवले देखील !
यात कौतुक करण्यासारखे काही ही नाही हे एकदम मान्य ! पण नाना पाटेकरचा संवाद आठवून माझे डोके मात्र क्षणभर गरगरलेच ! "एक साला मच्छर आदमीको हिजडा बना देता हैं" ! आमच्या सर्वांच्या मेहनतीवर आता महाडमधले वाढलेले डास पाणी फिरवणार का काय ? आम्हाला सर्वांनाच सावध व तयारीत रहावे लागेल.
Members of the genus Aedes are known vectors for numerous viral infections. The two most prominent species that transmit viruses are A. aegypti and A. albopictus, which transmit the viruses that cause dengue fever, yellow fever, West Nile fever, chikungunya, eastern equine encephalitis, and Zika virus, along with many other, less notable diseases.
हे वाक्य व आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सापडलेली "झिका" ची केस ! डोके बधीर होणार नाही तर काय ?
Infections with these viruses are typically accompanied by a fever, and in some cases, encephalitis, which can lead to death.
त्यात बिचारा आमचा जनकल्याण रक्तपेढी,महाडचा अध्यक्षच नेमका झाल्या परिश्रमाने तापाने फणफणला ! काळजी वाटणारच ना ?
A vaccine to provide protection from yellow fever exists, and measures to prevent mosquito bites include insecticides such as DDT, mosquito traps, insect repellents, and mosquito nets.
आता हे गोळा करीत फिरावे लागते की काय ही भीती वाटते आहे.
Some species of this genus transmit serious diseases, including dengue fever, yellow fever, the Zika virus, and chikungunya.कुठे कुठे लक्ष द्यायचे ?
Aedes mosquitoes are visually distinctive because they have noticeable black and white markings on their bodies and legs. Unlike most other mosquitoes, they are active and bite only during the daytime. The peak biting periods are early in the morning and in the evening before dusk. घरे स्वच्छ करायची का यांच्याशी लढायचे ?
Comments