Pompeii, Naples,Campania,Italy
- dileepbw
- Aug 5, 2021
- 1 min read
"Pompeii, Naples,Campania,Italy"
प्रकाश चिरमाडेने पाठविलेला जनकल्याण रक्तपेढी,महाड पासून जेमतेम १५ कि.मी.अंतरावर असलेल्या,६३७ लोकवस्ती असलेल्या तळीये,ता.महाड,जि.रायगड या गावावर कोसळलेल्या दरडीच्या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या ८४ व्यक्तींच्या तेराव्याच्या विधीची ह्रदयद्रावक ध्वनिचित्रफीत पाहून मन अक्षरश: पिळवटून निघाले व माझ्या १९८८ सालच्या युरोप दौर्यातील "Pompeii, Naples,Campania,Italy" या एका पाठोपाठ एक सात वेळा जमिनीत गाडल्या गेलेल्या शहराच्या ह्रदयद्रावक आठवणी जागृत झाल्या.
इ.स. ७९ साली "तळीये" या गावा प्रमाणेच "पॉम्पेई" हे शहर "माउंट व्हेसुव्हियस" या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेच्या २० फूट ढिगार्या खाली दडपले जाऊन नष्ट झाले होते.आजही तेथे झालेल्या उत्खननात Doric Temple,Apollo Temple, Pappamonte city wall असे ग्रीक अवशेष व Etruscans inscriptions व अवशेष तेथे पहायला मिळतात.त्यानंतरचे जमिनीत गाडले गेलेले Syracuse, Samnite, Abruzzo, Molise,Romans(Teatro Grande,Temple of Jupiter,Basilica, Comitium,Stabian Baths,Portico,Villa of the Mysteries,Villa of Diomedes,Eumachia Building,Sanctuary of Augustus and the Macellum,Serino Aqueduct)Nucerians, Praetorian काळातील अवशेष तेथे क्रमाने पहायला मिळाले.
इ.स.६२ साली भूकंप हा सर्वात मोठा भूकंप होता असे आधुनिक संशोधन सांगते.या उत्खननातून बांधकामशास्त्रात झालेले बदल सहज लक्षात येतात.तसेच काही बदल यापुढे महाडच्या बांधकामांमधे करत जावे लागतील.जनकल्याण रक्तपेढी,महाड देखील त्याला अपवाद नसेल.
Comentários