top of page

Septic tank

  • dileepbw
  • Aug 7, 2021
  • 1 min read

"संपूर्ण महाड शहर हाच मोठा Septic tank"


सुनील आगरकरचे गणित काल पासून काही तरी बिघडलेले दिसते खास ! त्याच्या "Septic tank" वरील मताला सुभाष सुराणाने सडेतोड उत्तर दिले हे एक प्रकारे बरेच झाले.महाडच्या महापूराच्या आपत्ती नंतर महाडची "Drainage System" नीट नसल्यामुळे Malaria, Chikengunia,Dengue,Infectious hepatitis, enteric fever, amoebiasis इ.पूरपश्चात आपत्तींनी तोंड द्यावे लागणारे आहे.त्याची चुणूक जनकल्याण रक्तपेढी,महाडने गेल्या दोनच दिवसात घेतलेली आहे. मलेरिया व हिमोरेजिक डेंगीच्या दोनच रूग्णांनी रक्तपेढीतील रक्ताचा साठा साफ केला आहे.


महाड शहराची भौगोलिक अवस्थाच एखाद्या भल्या मोठ्या "Septic tank" सारखी झालेली आहे.एका बाजूला सह्यकडा व दुसर्‍या बाजूला वसिष्ठी नदी अशा कोंडीत सापडलेल्या महाड शहराला मुंबई-गोवा हायवेने घातलेली तीन-चार फुट उंचीची भिंत अजूनच कोंडीत पकडते आहे.त्याततच महाड शहराच्या दोन्ही बाजूला नंदिनी व काळ या दोन नद्यांनी वेढलेले असल्यामुळे व त्यांचे वसिष्ठी नदीशी होणार्‍या संगमामुळे दरवर्षी हे शहर पावसाळ्यात पाण्याने संपूर्णपणे वेढले जाते व त्याचा एक प्रकारे मोठा

"Septic tank" तयार होतो.यावर्षी पर्जन्यराजाचा प्रकोप झाला व पाण्याची मोठीच कोंडी निर्माण झाली.तिकडे जसे समुद्राला "उधान" येईल तसे वसिष्ठी नदीला सामावून घेण्यात समुद्र देखील नकार देई व हे "बॅक वाॅटर" पुन्हा महाड शहरात घुसे.


आगरकरच्या सूचने नुसार समस्त महाडकर जर उघड्यावर शौचास जाऊ लागले तर त्यांची विष्ठा वाहून समस्त महाड शहराला "विष्ठान्न" सेवन करावे लागेल.असे झाले तर तेथे एक नाही अनेक रक्तपेढ्या उभाराव्या लागतील.


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page