Sugar icing appearance
- dileepbw
- Aug 7, 2021
- 1 min read
"Sugar icing appearance"
घरी कधी साधा चहा सुध्दा करायची वेळ आलेली नसल्याने वसतीगृहात रहायला जायचे म्हणून खिचडीचा व भाताचा कुकर तरी लावायला शिकलो. एवढी मोठी "पाकसिध्दी" एवढा मोठा घोडा झाल्या नंतर प्राप्त झालेली असल्याने "Sugar icing" सारखी "कलाकारी" येणे तर लांब पण ऐकलेली असणे सुध्दा शक्य नव्हते.आणि इकडे आमच्या पॅथाॅलाॅजीच्या ट्यूटर कुलकर्णी मॅडम जीव ओतून आम्हाला Splenic Icing शिकवत होत्या.त्या दौंडाच्या असल्याने त्यांना ही बहुधा "Sugar Icing" ही "पाककला" माहितच नसावी.असो.आज तुम्हाला सांगतो.
"साखरेचे खाणार त्याला देव देणार" ही म्हण माहित आहे का सर्वांना ? तोच हा प्रकार आहे.एखादा खाद्य पदार्थ पिठी साखर वापरून अधिक गोड व अधिक आकर्षक करणे म्हणजे "Sugar Icing" ! त्यासाठी विना उष्णता विरघळणारी(म्हणजे पिठी साखर/Confectioner’s sugar) साखर व दूध किंवा पाणी समप्रमाणात घ्यायची व चांगली घोटायची.त्यात स्वादासाठी थोडा व्हॅनिला घालायचा.हे मिश्रण अर्ध्या तासात गोठायला लागते.त्याच्या आत आपल्याला हवे ते डिझाईन आपल्या हव्या त्या खाद्य पदार्थांवर काढायचे.इतके सोप्पे आहे
"Sugar Icing" !
निसर्ग देखील अनेक विकारांमधे ही पाककलेची हौस भागवून घेतो.मी फक्त Spleen चे "Sugar Icing" पाहिले आहे.
Thickening of the splenic capsule accompanied by hyalinization seen in hyalinising perisplenitis,thickened and whitish hepatic capsule seen in chronic perihepatitis and cardiac cirrhosis,whitish appearance of the serosal surface of the intestine seen in chronic fibrosing peritonitis simulate "sugar icing" of these organs.
Comments