top of page

"माझे दलितायन - भाग ७"

  • Sep 14, 2022
  • 1 min read

"माझे दलितायन - भाग ७"

गेली जवळ जवळ दहा वर्षे मी माझ्या वाणी समाजातील असंख्य उपजातींना विवाहांद्वारे मुठमाती देण्यासाठी प्रयत्न करतो आहे.लिंगायत वाणी समाजाने त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे.

माझ्या अभ्यासानुसार इ.स.१८६३ मध्ये मुंबई शहर हे “सर्व जातीय लोकस्थळ” बनले व भिन्न जातींचे लोकांमधील सार्वजनिक व्यवहार वाढू लागले.

जाती व व्यवसाय यांची घट्ट वीण उसवू लागली.

कायद्यासमोरील समानता प्रस्थापित झाली.धर्म चिकित्सेला चालना मिळाली.त्यामुळे "एकोप्या" ची व परस्पर "सहकार्या" ची आवश्यकता मध्यमवर्गीयांना जाणवू लागली.त्यांना "जातीव्यवस्था" हा मोठा अडसर वाटू लागला.(संदर्भ:-१९ व्या शतकातील महाराष्ट्र-मध्यम वर्गाचा उदय-डॉ.राजा दीक्षित,भा.इ.सं.मंडळ, पुणे,दाखल क्र.२८४८४).

माझा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज इ.स.१८६३ मध्ये बहुसंख्येने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वास्तव्याला असलेला समाज असल्याने त्यांच्यात मात्र हा बदल अजून सुरु झालेला नव्हता.आता मात्र या समाजात अनेक आंतरजातीय व आंतरउपजातीय विवाह सर्रास केले जात आहेत.हे सांगायला आनंद वाटतो.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page