खोपडी
- dileepbw
- Sep 15, 2022
- 2 min read
"खोपडी"
आपण MBBS च्या दुसर्या वर्षाला शिकत असताना खोपोलीला हातभट्टीच्या दारूचे "खोपडी कांड" घडलेले कुणाकुणाला आठवते आहे ? आमच्या वाॅर्ड नं.१३ मधे ही "अशुध्द" खोपडी (मिथॅनाॅल) ढोसून बेशुध्द पडलेले डझनावरी रूग्ण प्रवेशित झाले होते.त्यावर उपाय होता विदेशी "शुध्द" दारू (इथॅनाॅल) ढोसणे.त्यामुळे प्रत्येक रूग्णाच्या शय्येजवळ "शुध्द वारुणीचा खंबा" व त्यातून मद्य वितरण करणारी पांढर्या शुभ्र गणवेशातील परिचारिका "साकी" च्या रूपात दिसत होती.सगळे दृश्य अगदी "उमरखय्याम" ची आठवण करून देणारे होते.
आज या घटनेची आठवण व्हायचे कारण म्हणजे विवेक जोशीने पाठविलेली "Auto-brewery syndrome" ही केस ! काय गंमत आहे पहा या विकाराची ! "तु पी या मत पी ! मैं तुझे पिलाकर ही रहूॅंगा !" असे मेंदूला सुनावत पोट अन्नातून मिळालेल्या बटाटा,साबुदाणा अशा उपवासाच्या पदार्थांचे देखील खुशाल मद्यात रूपांतर करीत सुटते ! जंगलात "हातभट्टी" लावावी अगदी तसेच !
या "Auto-brewery syndrome(ABS)" ला "Gut fermentation syndrome, किंवा "Endogenous ethanol fermentation" किंवा "Drunkenness disease" असे देखील म्हणतात.
या दुर्मिळ विकारात शरीरात वाढलेले एक प्रकारचे जंतू(bacteria or fungi -Saccharomyces cerevisiae, S. boulardii, Candida albicans, C. tropicalis, C. krusei, C. glabrata, C. kefyr, C. parapsilosis, Klebsiella pneumoniae, and Enterococcus faecium) खाऊ त्या पिष्टमय पदार्थाचे "दारू" त रूपांतर करतात.आहे की नाही धम्माल ! कुठल्याही "बार" मधे जायची गरजच नाही. तुझे आहे तुजपाशी !
कसे घडते हे ? हे जंतू "lactic acid fermentation" किंवा "mixed acid fermentation" या प्रक्रियांचा वापर करून शरीरात "ethanol" हे मद्य तयार करतात.हे मद्य आतड्यात शोषले जाते व रक्तावाटे मेंदूपर्यंत पोहोचते.त्यामुळे अशी व्यक्ती "दारुड्या" सारखी वागू लागते.दारू न पिताच याला "चढली" कशी म्हणून सगळेच संभ्रमात पडतात.आहे की नाही गंमत ?
वैद्यकीय संशोधन असे सांगते की prolonged antibiotic use,poor nutrition and/or diets high in carbohydrates, pre-existing conditions such as diabetes and genetic variations that result in improper liver enzyme activity ही त्याची कारणे असू शकतात.हीच घटना पोटा ऐवजी मूत्रमार्गात घडू लागली तर त्याला "urinary auto-brewery syndrome" असे म्हणतात.
डोकेबाज वकील मंडळींनी या विकृतीचा दुरूपयोग आपल्या अशिलाची मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याच्या आरोपातून सुटका केल्याच्या घटना जगभर घडलेल्या आहेत. कुणाची पोळी कशी पिकते पहा ! शरीरात पेटलेली ही "हातभट्टी" विझवायचा मार्ग एकच ? विविध औषधे वापरून शरीरातील या जंतूंचा नाश करायचा व अन्नातूत होणारा पिष्टमय पदार्थांचा "कच्चा माल" बंद करायचा.
हा किस्सा वाचून आमचा शीघ्रकवी वर्गमित्र डाॅ.शांतारामने केलेली ही कविता वाचा व हसून हसून लोटपोट व्हा !
क्या वरदान दिया भोले महादेवने बनाया मयखाना ही पेटमे
बिना खरीदे बिना पिये अहोरात्र सुरा मिलती है सारी मूफ्तमे
किस्मतका मारा बेचारा हुआ बदनाम मौत मिली ये आखिरमे
पीनेवालो अब तो सुधरो नही तो हो जायेगा लिव्हरफेल अंतमे ।




Comments