“गार्गी अजून जिवंत आहे”
- Oct 13, 2022
- 1 min read
“गार्गी अजून जिवंत आहे”
माझा "किरवंत" हा लेख वाचून आरतीला मंगला आठल्येकर यांनी लिहिलेल्या “गार्गी अजून जिवंत आहे” या पुस्तकाची आठवण झाली.असे काय आहे या पुस्तकात ?
एकोणिसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब!
वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला,’अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’ हाच "क्रांतीकारी प्रश्न" माझी पॅथाॅलाॅजिस्ट मेव्हणी डाॅ.माधुरी येवला(सिनकर) व सर्जन मेव्हणी डाॅ.मिनाक्षी येवला(पाटे)यांनी आपल्या मातोश्रींच्या निधनाच्या वेळी उपस्थित केला व माझे चुलत श्वशुर डाॅ.एकनाथ येवला यांना चांगलेच पेचात पकडले.शेवटी दोघींनी शवाग्नी दिला व माझ्या समाजात एक मोठीच "क्रांती" घडवून आणली.त्या दोघींना मी आधुनिक "गार्गी" म्हणतो.कोण ही "गार्गी" ?
सार्या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे,त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्या "गार्गी" चा काळ खूप मागे पडला आहे.पण गार्गी अजून गुलाब,माधुरी व मिनाक्षी यांच्या रूपात जिवंत आहे.
नुसता प्रश्न करूनच गुलाब थांबली नाही,तर सार्या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला.रसुलाबाद घाट! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सार्या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत.तिच्याकडे पाहाताना "गार्गी" चा भास होतो. आणि मनात येतं,कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली? गार्गी अजून जिवंत आहे.
माझ्या माधुरी व मिनाक्षी या दोन्ही मेव्हण्या पण "गार्गी" चाच अवतार आहे.त्यांच्या उदाहरणामुळे आज माझ्या समाजात मुलींना आपल्या माता-पित्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत.दोघींचे मन:पूर्वक अभिनंदन !
Comments