"सेवानिधीसाठी आवाहन"
*"सेवानिधीसाठी आवाहन"*
जनकल्याण रक्तपेढी परिवाराचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी समाजातील संवेदनशील व प्रतिष्ठित व्यक्तींना खालील आवाहन करू इच्छितो.
जनकल्याण रक्तपेढी,पुणे ही सेवाभावी संस्था १९८३ सालापासून म्हणजे गेली जवळ जवळ चाळीस वर्ष गरजवंत रूग्णांना अव्याहतपणे रक्त पुरवणारी रक्तपेढी आहे.रक्ताची वाढती गरज व सारखे बदलणारे आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेता रक्तपेढीच्या आर्थिक गरजा देखील वाढत आहेत.
हे तंत्रज्ञान समाजातील गोरगरीबांपर्यंत पोहोचवायचे असेल तर समाजातील धनवानांना आपला आर्थिक मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे.तरच हा "जगन्नाथाचा रथ" पुढे रेटणे शक्य होणार आहे.
जनकल्याण रक्तपेढी,पुणेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत अनेकांनी तन,मन,धन व ज्ञान अर्पण करून हे सेवाकार्य उभे केले आहे.ज्याच्याकडे "रक्त" होते त्याने "रक्त" दिले,ज्याच्याकडे "श्रम" होते त्याने "घाम" दिला व रूग्णांचे "अश्रू" पुसले. असे हे सेवाकार्य वर्धिष्णू आहे.जनकल्याणाचा हा वृक्ष असाच फुलायचा असेल तर आपल्या सारख्या सुह्रुदांनी त्याची "आर्थिक शिंपण" करणे आवश्यक आहे.त्यासाठी आम्ही "सेवानिधी" हा "निधी संकलना" चा प्रकल्प घेऊन आपल्याकडे आर्थिक मदतीची याचना करीत आहोत.
या आर्थिक मदतीतून ज्यांना आयुष्यभर दुसर्याच्या रक्तावर जगावे लागणार आहे अशा दरमहा रक्त भरावे लागणार्या शेकडो थॅलेसिमियाग्रस्त बालकांना "विनासेवाशूल्क" रक्त देणे शक्य होणार आहे.तर कॅंसरग्रस्त रूग्णांचा आर्थिक भार निम्म्याने कमी होणार आहे.त्यामुळे ज्यांना या समस्यांची जाणिव आहे अशा व्यक्तींना निधी संकलनाच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा रक्तपेढीचा मानस आहे.आपण सहभागी होणार ना ? स्वत: धनदाते व्हा व इतरांनाही धनदाते व्हायला सांगा ! आपल्या आवाहनाला समाजामधे मोठी किंमत आहे.त्यामुळे शक्य असेल तर निधीसंकलक व प्रचारक म्हणून या प्रकल्पात सहभागी.आपले स्वागत आहे.
*डॉ. दिलीप वाणी*
Comments