top of page

"बहिरी ससाणा"

Dec 16, 2022
5 min read

"बहिरी ससाणा"

बंड्याने बरेच दिवसांनी आपले "पक्षी निरीक्षण" सादर करून आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे.राजस्थानच्या अभ्यासदौर्‍यावर असलेला बंड्या येत्या काही दिवसात आपल्या सर्वांनाच एक मोठीच "मेजवानी" देणार तर !

आजची मेजवानी आहे "बहिरी ससाणा" ! Shikra,Falcon,Eagle, Euresian Sparrowhawk,बाज़,श्येन अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा पक्षी पहाताच मला आठवण झाली ती रणबीरकपूरने "बाजीराव-मस्तानी" या चित्रपटात साकारलेल्या बाजीरावाची ! आठवतो का त्याचा तो संवाद ? "चितेकी चाल" और "बाजकी नजर" ? जिस तरह "बाज़" आकाश में परवाज़ भरता है और  चिड़िया पर झपटता है उसका कोई जबाब नहीं ! समुद्रातला मासा असो,नाहीतर झाडावर कुदणारे माकड,जंगलात बागडणारे हरीण असो नाहीतर अंगणात चरणारी बकरी ! याच्या "तीक्ष्ण नजर व गतीमान झडप" यातून कुणीही सुटू शकत नाही.

कारण आपण तीनच "प्राथमिक रांग" पाहू शकतो.तर हा पठ्ठ्या "पाच रंग" पाहू शकतो.आहे की नाही आपल्यापेक्षा भारी ?

वजनाने दीड किलो पासून ते काही किलो(स्टेलर समुद्री ईगल - ९ किलो) भरणारी ही "शिकारी पक्ष्या" ची प्रजात(जगभर १५०० ते २००० प्रजाती) आपल्यापेक्षा जास्त वजनाची शिकार लीलया करू शकते. आपल्याकडे ३/४ जातींचे "बाज" पक्षी दिसतात.त्यातील "मधुबाज" आणि "पांढऱ्या डोळ्यांचा गीर्रे "बाज" हे त्यातल्या त्यात सहजपणे दिसतात."मधुबाज(ओरीएंटल हनी बझार्ड)" या पक्षाचे मुख्य खाणे हे "मधमाश्या" आणि इतर गांधीलमाश्या !अतिशय शिताफीने ते एखाद्या पोळ्यावर झडप घालतात आणि आतील मधमाश्या, त्यांची अंडी, अळ्या, कोष, मध व घरट्याचा भाग खातात. मधमाश्या चावू नये म्हणून त्यांच्या पायाचे खास टणक खवले असतात. त्यांच्या चोचीजवळची पिसेसुद्धा काहीशी कठीण असतात त्यामुळे त्या तीथे मधमाश्या दंश करू शकत नाहीत. त्यांचे पाय आणि नख्या ही अशा प्रकारची पोळी, घरटी फोडण्यासाठी खास बनलेले असतात. या त्यांच्या खाण्याबरोबरच त्यांना नाकतोडे किंवा इतर किटक, पक्ष्यांची अंडी, छोटे पक्षी, बेडूक हे सुद्धा अन्न म्हणून चलते.शिक्रया" ची चाहूल लागताच बुलबुल,सातभाई,वेडे राघू, साळुक्या,पारवे हे पक्षी घाबरून उडायला लागतात किंवा बसल्या जागेवरूनच दुसऱ्यांना सावध करणारे आवाज काढतात.अशा सलामी नंतर जर आपण आसपास नीट लक्ष देऊन पाहिलं,तर गोलाकार पंखांची उघडझाप करत आणि अधून मधून संथपणे तरंगत येणारा हा "बहिरी ससाणा" आपल्या नजरेस पडतो.तीक्ष्ण नजर,बाकदार चोच आणि धारदार नख्या यांची नैसर्गिक देणगी मिळालेला शिक्रा सरडे,सापसुरळ्या,खारी,पक्षी यांची शिकार करतो.त्यामुळे याचे आगमन होताच जो तो लपण्यासाठी जागा बघतो.त्याला पाहून या झाडावरून त्या झाडावर तुरूतुरू धावणारी आणि उड्या ठोकणारी पिटुकली "चानी(म्हणजे खार)" सुद्धा क्षणभर थबकते. शेपटी नाचवत घशातून किचकिचल्यासारखा आवाज काढून जणू सगळ्यांना सांगत असते "सावधान" !

आकार आणि रंग यावरून या पक्ष्याच्या तीन उपजाती(टक्कल गरुड,हार्पी गरुड व गोल्डन ईगल) अशा काही उपप्रकारांची किंवा भौगोलिक वंशांची नोंद झाली आहे. पाठीकडून निळसर राखी आणि पोटाकडून पांढऱ्या रंगाच्या या पक्ष्याच्या छातीवर आणि पोटावर तांबूस तपकिरी रेषा असतात. या रेषा पाण्यावर सूक्ष्म लहरी उठाव्यात तशा दिसतात. मादी नरापेक्षा मोठी असते शिवाय मादीचा रंग पाठीकडून तपकिरी असतो.

अशा या "शिकारी" पक्ष्याच्या प्रेमात अरबस्तानचे शेख पडले नसते तर ते नवलच ! अरब देशांमध्ये, "बाज" अर्थात "गरुडा" द्वारे शिकार करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.गरुडाला शिकारीसाठी योग्य प्रशिक्षण दिले जाते. डोळे मिचकावताना हे गरुड शिकारीचे सर्व काम करतात. अरब देशांमध्ये आणि इस्लामिक परंपरेत गरुडाचे महत्त्व काय आहे ते आता जाणून घ्या.

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात गरुड दिसला,तर त्याचा अर्थ असा आहे की त्याचा मुलगा त्याच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचा माणूस होईल. जर एखाद्या व्यक्तीला गरुडाची काही पिसे पकडताना स्वप्न पडले, तर याचा अर्थ असा होतो की त्याच्या हातात काही शक्ती येतील. जर एखाद्या राजाला स्वप्नात त्याच्या हातातून गरुड उडताना दिसला, तर त्याचा अर्थ असा होतो की त्याच्याकडे सत्तापालट होईल. जर असे गरुड स्वप्नात दिसले ज्याचा मृत्यू झाला असेल तर ते खूप वाईट मानले जाते. याचा अर्थ राजा मरेल.

"गरुडांकडून शिकार" हा आहे अरबस्तानातील लोकप्रिय खेळ व त्यांचा राष्ट्रीय पक्षी ! असे मानले जाते की अरब देशांमध्ये "फाल्कनरी" ची परंपरा १४०० वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे. फॉल्कनेरी हा सौदी, युएई आणि इतर अरब देशांमध्ये लोकप्रिय खेळ आहे. शेखांच्या मनगटावर बसलेले गरुड संकेत मिळताच शिकारीवर भरारी घेतात. गरुड हा एक अतिशय शक्तिशाली पक्षी आहे आणि ते स्वतःहून अनेक पटींनी मोठ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिकार करू शकतात. हे गरुड हरीण, ससे, जंगली शेळ्यांसह सर्व प्राणी किंवा पक्ष्यांना त्यांच्या मजबूत पकडीने जखमी करतात. नंतर, शेख आणि त्याच्या मित्रांची मेजवानी बनते. शिकारीसाठी प्रशिक्षित प्राणी किंवा पक्षी यांना "जवारेह" असे म्हणतात.पर्शियाच्या राजाने सुरू केली होती ही परंपरा पर्शियाचा सुरुवातीचा सम्राट "अल हरिथ बिन मुआविया" हा पहिला "फॉकनर" मानला जातो. असे म्हणतात की त्याने एका गरुडाला पक्ष्याची शिकार करताना पाहिले. तो त्या गरुडाच्या सौंदर्याच्या आणि शिकारीच्या भावनेच्या प्रेमात पडला आणि त्याने त्याला पकडण्याचा आदेश दिला.सम्राटाने गरुडाला पाळले आणि त्याला शिकारीचे प्रशिक्षण दिले.असे म्हणतात की हा गरुड नेहमी राजाच्या मनगटावर बसत असे.

कुराणानुसार,गरुडाने पकडलेली शिकार खाण्याची परवानगी आहे.मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये फाल्कनेरी न्याय्य आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जर कुत्रे, पक्षी किंवा बाज यासारख्या इतर भक्षकांनी कोणतेही शिकार पकडले असेल, तर त्याचे मांस खाण्याची परवानगी आहे,भले भक्ष्यातील काही भाग भक्षक प्राणी किंवा पक्ष्याने खाल्ले असेल.

ताशी ३२० कि.मी.वेगाने झेप घेणारा हा "शिकारी पक्षी" सलग ६ ते ८ तासांचे "उड्डाण" भरू शकतो. १३ ते २३ इंच लांबीचा व ९ ते ४७ इंच लांबीचे पंख बाळगून असलेल्या तीक्ष्ण दृष्टी लाभलेला हा "शिकारी पक्षी" ७ कि.मी.अंतरावरील शिकार देखील अचूकपणे पाहू शकतो.गरुडाची दृष्टी खूपच "तीक्ष्ण" आहे.

"गरूड" हा जगात "दोनदा जन्म" घेणारा पक्षी आहे.एकदा तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा आणि दुसरा जेव्हा तो म्हातारपणाच्या टप्प्यावर पोहोचतो आणि जगण्याचा किंवा मृत्यूच्या प्रतीक्षेत राहण्याचा निर्णय घेतो तेव्हा. "बाज" एक वेगवान पक्षी मानला जातो परंतु जेव्हा त्याला अशक्तपणा जाणवू लागतो तेव्हा त्यास आयुष्याच्या एका भारी टप्प्यातून जावे लागते.गरुड पक्षी सुमारे ७० ते १०० वर्षे वयापर्यंत जगतो.परंतु वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत,त्याचे पंख कमकुवत होतात आणि त्याला उडण्यास त्रास होण्यास सुरवात होते. वयाच्या ४० व्या वर्षानंतर,गरुडाचे पंजे कमकुवत होते आणि ते शिकार करू शकत नाहीत. जंगलात गरुडांचे सरासरी आयुष्य १४ ते ३५ वर्षे असते. इतर पक्ष्यांच्या आयुर्मानाच्या तुलनेत त्यांचे आयुष्य विशेषतः दीर्घ असते.गरुड हा आकाशातील सर्वात शक्तिशाली पक्षी मानला जातो.बाज,लांब पंख आणि हवेत वेगवान उड्डाण करण्याची शक्ती यांच्या मजबूत स्नायूमुळे त्याला "फ्लाइट मशीन" असेही म्हणतात.

बंड्याने पाठविलेला "बहिरी ससाणा" पाहून "राजा शिबी,जटायू अशा काही पौराणिक कथांची आठवण झाली.तसेच William Shakespeare,Alfred,Lord Tennyson,Ted Hughes इ.सुप्रसिध्द लेखकांनी केलेले त्यांचे उल्लेख देखील आठवले.

पौराणिक काळापासूनच बाज पक्षी धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले गेले आहेत.पृथ्वीवरील सर्वात वेगवान पक्षी म्हणून तो ओळखला जातो.प्राचीन काळापासून दुसर्‍या महायुद्धापर्यंत,शत्रूंना कबुतराच्या संदेशांची देवाणघेवाण रोखण्यासाठी गरुडाचा वापर केला जात असे.बाजांची पाहण्याची क्षमता अप्रतिम आहे. गरुड मनुष्यापेक्षा २.६ पट जास्त पाहू शकतो. प्राचीन काळापासून लोक गरुड पाळत आहेत. राजांच्या कहाण्या व चित्रांतही आपण ते पाहू शकता.

"अस्तंगत" होण्याच्या मार्गावर असलेला हा पक्षी पाहून बंड्याला खूपच आनंद झाला.मला देखील Nightingale व Hawk या पक्षां मधला एक काव्यमय संवाद आठवला.ऐका.

"Nightingale & Hawk"

Music's sweet chorister, the Nightingale

To whom with sighs she said: 'O set me free,

And in my song I'll praise no bird but thee.'

The Hawk replied: 'I will not lose my diet

To let a thousand such enjoy their quiet.'

हा पक्षी "अस्तंगत" होण्याची कारणे आज शोधली. सांगतो.चांगला बाजारभाव असलेला "साल्मन" मासा फस्त करीत असल्याने अलास्का येथील कोळ्यांनी त्यांचा मोठा उच्छाद सुरू केला.त्यात लाखो "बाज" पक्षी मारले गेले.ब्रिटनमधे देखील हौशी कबुतर शौकिनांनी आपली पाळलेली कबुतरे वाचविण्यासाठी हजारो "बाज" पक्षांना यमसदनाला पाठविले. या संदर्भात फिलीपिन्सने उचलेले पाऊल मात्र वाखाणण्यासारखे आहे. फिलीपिन्समधे "बाज" हा त्यांचा राष्ट्रीय पक्षी मारल्यास किमान बारा वर्षांच्या कारागृहाची शिक्षा ठोठावली जाते. हा पक्षी दुर्मिळ होण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे "डीडीटी,polychlorinated biphenyls (PCBs),cyclodienes, organochlorines इ. कीटकनाशकांचा मोठया प्रमाणावरील वापर ! हे थांबवले नाही तर हा "शिकारी पक्षी" अस्तंगत व्हायला फार काळ वाट पहावी लागणार नाही.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page