अंकारा,तुर्कस्तान
- dileepbw
- Aug 18, 2021
- 1 min read
"अंकारा प्राचिन वस्तुसंग्रहालय,तुर्कस्तान"
आपल्या "सका/शक/Scythian" वंशाचा अभ्यास करण्यासाठी मी "तुर्कस्तान" चा अभ्यास दौरा करीत असताना तुर्कस्तानची राजधानी "अंकारा" येथील प्राचिन वस्तुसंग्रहालयाच्या संचालकांना व एका अमेरिकन पुरातत्वशात्रज्ञ महिलेला भेटण्याचा योग आला.मी माझ्या पूर्वजांच्या इतिहासाचा शोध घेत आहे हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. आता पर्यंत झालेले माझे संशोधन ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले व त्यांनी लिहिलेले एक पुस्तक देखील मला भेट दिले.एव्हढेच नव्हे तर फक्त संशोधक मंडळींसाठी राखीव व सर्वसामान्य पर्यटकांसाठी वर्जित असलेल्या संशोधन क्षेत्रात प्रवेश देवून सध्या चालू असलेले संशोधन देखील दाखविले.हे मी माझे मोठेच भाग्य समजतो.




Comments