अफगाणीस्तानचे बनावट नाट्य
- Aug 23, 2021
- 4 min read
"अफगाणिस्तानचे बनावट नाट्य" हा वे.भूषण दिगंबर जोशी,वेंगुर्ले यांचा खालील लेख वाचला व माझे मन माझ्या "सका/शक/Scythian" लोकांच्या इतिहासाच्या अभ्यासात रमून गेले.
गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्या की एक वेगळीच थंड डोक्याने व पूर्णपणे धर्मांधपणे आचरण्यात आणणारी योजना समोर येतेय.सिरीया या इस्लाम बहुल देशात ISIS या आतंकी संघटनेने प्रचंड आतंक माजवला लाखो सिरीयन नागरीक युरोपात पळाले व निर्वासीत म्हणुन दाखल झाले.ब्रह्मदेशातुन लाखो रोहिंगे भारतात निर्वासीत म्हणून आलेत.बांगलादेशातुन रोजगाराच्या निमित्ताने लाखो बांगलादेशी भारतात घुसले
आता अफगाणीस्तानातुन असेच लोंढे बाहेर पडताहेत.हेही निर्वासित म्हणून येणार.मग अनेक राष्ट्रे मानवतेचा कळवळा आणुन यांना आश्रय देणार.त्या करता त्या त्या देशातील प्रांतातील त्यांचे धर्मबांधव त्यांना आश्रय द्या या करता मागणी करणार हिंसक आंदोलन करणार. (मुंबईतली रझा अकादमीची दंगल आठवा ती रोहिंग्या समर्थनार्थ झालेली होती)सेव्ह गाझा आंदोलन आठवा
काही वर्षांनी हे त्या राष्ट्रात हळुहळु आपले पाय पसरतात. आम्हाला तुमचे हे कायदे मान्य नाहीत.आमचा धार्मिक कायदा असे सांगतो असले प्रकार सुरू करतात. निदर्शने करतात.मग हिंसक आंदोलने करतात.आता गंमत पाहा. आयसीस,बोको हराम,जैश,सिमी,तेहरिक ए तालिबान, लष्कर ए तोयबा,तालिबान टोळ्या,अल कायदा या सर्वांचे ध्येय एकच आहे.जगभरात आपला धर्मप्रचार व प्रसार करणे व इस्लामचे राज्य जगावर आणणे.मग आता तालिबान वेगळे काय करतंय ? ते कुराण व हदीस या पुस्तकात लिहिलेले शरीयत कायदे तिथे लागु करतय मग आता तिथुन अफगाणी नागरिक का पळताहेत?तिथे बहुपत्नीत्व,हलाला,तोंडी तलाक,बुरखा, दाढी,स्त्री पुरुष वर्तन सगळे त्यांच्याच ग्रंथामध्ये लिहिलेले नियम पाळा सांगताहेत ना ?मग यांची भिती का वाटतेय त्यांना?
या अफगाणी लोकांना नक्की भिती कसली आहे? आपल्या धर्मबांधवाची? आपल्या धर्मग्रंथांच्या नियमांची?
हे एक सुनियोजित षडयंत्र आहे? आधी आसरा मागायचा मग बोट दिले कि हात धरायचा असा डाव तर त्यात नाही ना?
जेव्हा कौम बढाओ मोहिम भारतात सुरू झाली तेव्हा असंच दुर्लक्ष झालं.आता त्यांची जनसंख्या वाढल्यानंतर दादागिरी सुरु झालीय (केरळ, काश्मीर,प.बंगाल आसाम इथल्या घडामोडी पाहता आपल्या लक्षात येईलच), आतंकीस्लिपर सेल मधे यांची भूमिका मोठी आहे. बांगलादेशी असेच झोल करुन नेत्यांना हाती धरुन सरकारी बाबुंना चिरीमिरी देवुन भारतीय नागरिक झालेत. आता इथे ते दादागिरी करताहेत.रोहिंगे तर केरळात वसु लागले आहेत.ब्रह्मदेश सीमा कुठे ? केरळ कुठे?
तेव्हा या षडयंत्रास बळी न पडता फुकटची माणुसकी दाखवु नका .हिंदु,शिख मंडळीना सुरक्षित बाहेर काढा व सुखरूप आता व बाकीच्या मंडळी करता जवळपास त्यांच्याच बांधवांचे ५६ देश आहेत ते त्यांचे पाहतील.नजीब असाच मल्हारराव होळकरांच्या आश्रयास आला व त्याने पानिपत घडवलं हे विसरु नये.
ज्या अफगाणीस्थानात सध्या हे "थरारनाट्य" चालले आहे त्याचा प्राचीन इतिहास काय सांगतो ? महाभारतातील कौरवांची माता "गांधारी" हिचा हा "गांधार" देश ! चीनचे रेशीम,अफगाणिस्तानातील नीलमणी व भारतातील मसाल्याच्या वनस्पती अफगाणिस्तानातील "बाख्त" या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून इराणमार्गे तुर्कस्तानपर्यंत न्यायच्या व पीढे समुद्रमार्गे युरोपला विकायच्या व तेथील मौल्यवान धातू आशियात विक्रीसाठी आणायचे हा आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा व्यवसाय होता.उत्तरेला असलेला "काळा समुद्र" व त्याला तुर्कस्तानशी जोडणारी "मारमारा सामुद्रधुनी", तर दक्षिणेला असणारा "भूमध्य/मेडेटेरेनियन समुद्र" व त्याला तुर्कस्तानशी जोडणारी "एजिअन सामुद्रधुनी" अशा नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत सुरक्षित व्यापारी बंदरे असलेल्या तुर्कस्तानला विशेषत: "इस्तंबूल" शहराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनन्य साधारण महत्व होते.त्यामुळे "सका/शक/Scythian" वंशाचे व्यापारी तुर्कस्तानकडे आकृष्ट होणे स्वाभाविकच होते.आज तुर्कस्तानात स्थायिक झालेल्या "सका" लोकांनी व्यवसायात गाठलेली ऊंची पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता.त्यामानाने आज ही मसाल्यांच्या किरकोळ आठवडी बाजारात रमलेल्या माझ्या समाजाला खूप मोठी ऊंची गाठण्याची आवश्यकता आहे.
जसे गांधार(अफगाणिस्तान) देशातील "बाख्त" शहराला "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या प्राचीन इतिहासात महत्व आहे तसेच गुजरातमधील "लोथाल" या सिंधू संस्कृतीमधील बंदराला देखील अनन्य साधारण महत्व आहे. इ.स.पू.२३०० सालात तांबे,हस्तिदंत,इमारती लाकूड, मोती,नीलमणी(lapis lazuli),उंट,सोने इ. वस्तूंचा व्यापार आपले "सका/शक/Scythian" पूर्वज थेट युरोपशी करीत असत. रोम(Mesopotamia), ओमान, बहारीन इ. देशांशी त्यांचा व्यापार चालत असे.
(संदर्भ:- Mesopotamian inscriptions of Sargon of Akkad).इ.स.पू.तिसऱ्या व चवथ्या शतकात आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा "लापीस लाझुली(नीलमणी)" या मौल्यवान खनिजाचा व्यापार पश्चिमेकडील सुमेर,अक्कड(Mesopotamia),नाईल नदीचे खोरे(Egypt) येथे पर्यंत जाऊन पोहोचला होता.
(संदर्भ - Peter Roger Stuart Moorey - cf. Ancient Mesopotamian Materials and Industries, p. 86). आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची ही "लापीस लाझुली(नीलमणी)" ची निर्यात "दोन वशिंडे" असलेल्या "बक्ट्रीयन" उंटावरून होत असे व असे उंटांचे तांडेच्या तांडे अफगाणिस्तान मधील "बदक्शन' येथील "लापीस लाझुली (नीलमणी)" च्या खाणींपासून ते पार युरोप पर्यंत व्यापारासाठी प्रवास करीत असत. या व्यापारी मार्गावरील दुकाने,व्यापारी पेठ,धर्मशाळा, विश्रांतीस्थाने इ.चे यथासांग वर्णन "हिरोडोटस" नावाच्या ग्रीक इतिहासकाराने करून ठेवले आहे.
माझ्या तुर्कस्तानच्या अभ्यास दौर्यात याची पदोपदी प्रचिती येत होती.तुर्कस्तानातील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे इस्तंबूल येथे "सुलतान अहमद" याने ओटोमान वास्तूशास्त्रज्ञ "मिमार सिनान" याच्या कुशल मार्गदर्शनाखाली बांधलेली "निळी मशीद(Blue Mosque) ! सुमारे वीस हजार निळ्या(टरकाॅइज) टाईल्सचा वापर करून बांधलेल्या या निळ्या मशिदीचे अवाढव्य घुमट शेजारीच ग्रीकांनी बांधलेल्या "हगिया सोफिया" या चर्चपेक्षा बरेच ऐश्वर्य संपन्न वाटले.साहजिकच आहे ! या निळ्या मशिदीची ऊभारणीच मुळी "सका" संस्कृतीचा ग्रीकांच्या "हेलेनिस्टिक" संस्कृतीवरील राजकीय,सांस्कृतिक व आर्थिक विजय दर्शविण्यासाठीच केलेली होती.या निळ्या मशिदीच्या घुमटाचा अंतर्गत भाग केवळ अप्रतिम आहे.अफगाणिस्तान मधील "बदक्शान" येथील खाणीत सापडणारा "नीलमणी(Lapiz lasuli) व टरकाॅइज((Turcoise)" यांच्या फरशांचा(Iznik tiles) मुबलक वापर करुन घुमट आतून सजवला आहे.ही सजावट करताना "सका" लोक जसे आपली मौल्यवान खनिजे विसरले नाहीत तसेच मध्य आशियातील आपल्या "ट्यूलिप" या फुलाला देखील विसरलेले नाहीत.त्यामुळे घुमटाच्या सजावटीत ते जागोजागी आढळून येते.
इ.स.पू.४५०० - इ.स.पू. १९०० या "धातू युगा" च्या काळात "टेपी हिस्सार(Tepe Hissar)" या इराण मधील गावात केलेल्या उत्खननात सापडलेले "लापीस लाझुली (नीलमणी)" हे मौल्यवान असे व्यापारी खनिज),पौर्वात्य व वैशिष्ट्य पूर्ण काळ्या खापराची भांडी व मुद्रा (Blank clay tablets reminiscent of Proto-Elamite tablets, and a cylinder seal) या सारख्या पाश्चिमात्य वस्तू म्हणजे कालखंडाचे मापन करणारी एक अचूक मोजपट्टीच आहे.उत्खननात सापडलेल्या अशा वस्तूंमुळेच आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या प्राचीन इतिहासावर मोठा प्रकाश पडलेला आहे.
(संदर्भ - The Shelby White-Leon Levy Program for Archaeological Publications, Harvard University).
Comments