top of page

अहिराणी वयंबा

  • Dec 11, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील तरूणाईला आपल्या "अहिराणी" या मातृभाषेची किमान तोंड ओळख व्हावी या उद्देशाने कवी श्री.सुभाष वामन अहिरे यांच्या

"वयंबा" या अहिराणी कविता संग्रहातील "सीताहरण" हा प्रसंग उद्धृत करीत आहे.

समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी विशेषत: तरूणाईने तो अवश्य वाचावी.ही नम्र विनंती.

येक दिन रामले सांगे सिता

अव! भायेर या आथा

तुमी झावर पंघरीस्नी काय जपनात

त्या दखा कितला हरने दपनात.

वsss मायव्व! हाई धाक्कलंस हरीन

कस्सं तुरु तुरु पयी रायनं

त्यान्हा सोनाना कातडावर

मन मन्हं जायी रायनं

तुमी दवडाना गड्या

धरी लयाना त्याले

त्यान्हा कातडानी चोयी

सीsss द्याना माले

त्यानी मायनी ऊपाद मारु!

हाई बाट्टोड हरीन कसं काय धरु?

बायकोनं सांगेल आयकनच पडस

नहीते इन्हं रुसेल फुगेल भलतं नडस

बिचारा रामना इलाज खुटना

आनी हरीनना मांघे पयत सुटना

बिचारा पयीपयी थकना

आनी मंग कोनलेच नई दिखना

आथं हाई मावलीनी रामले फुलाई दिन्हं

तथं हरननी रामले भुलाई दिन्हं

सुखना जपेल नवराले उठाडी दिन्हं

आनी हरीनना कावामा गुताडी दिन्हं

लक्सुमन म्हने वयंजी.........

मन्हं डोकं आते फिरावू नका

रडीसनी तोफांड जिरावू नका

हायी बाट्टोड हरीन कहीस्न नडेल व्हतं

तुम्हनंबीका,चोयी मचूक आत्तेच आडेल व्हतं

काय वयंजी शान्या सुरत्या तुमी

हाई काय करी बठन्यात?

तुमनं चोयीनं नाव काढताच

बठ्ठ्या हरनी पयत सुटन्यात

काय करु माय! मनी अस्सी कस्सी घेरी ऊनी

याले आयमरीमाय खाव रावनले!यान्ही कपटी फेरी ऊनी

ह्या हरामी रावननी माले सोनानं हरन दखाडी दिन्हं

मी येडीनी म्हना भोया नवराले फसाडी दिन्हं.

तरी मनी सासू माले बजाडीसन सांगी रायंती

रामनी कायजी ल्हेवानं वचन मांगी रायंती

म्हने, व्हवूआंडेर तुटानं दुख मी पी ल्हीसू

तुन्हा सव्वासीनना कुकू तुना संगे दि दिसू

तू तुना डोयामा तेल घालीसनी जागे रायजो

मन्हा रामले हातवरना फोडना मायेक समायजो

मन्हा लक्सुमनले मायना मायेक जीव लावजो

तुन्हा धाक्कलसा देरवर नेंबन ध्यान ठेवजो

मी काय त्यासले इतला दूर जावानं सांग व्हतं का?

म्हंतं हाई काय जोडे हरीन से

तरीबी त्या हरीनना मांघे मांघे.............

वयंजी! हाई रडानं तोफांड बंद करा

आते मी सांगस ते ध्यानमा धरा

हाई आखेल रेघना भायेर नका इज्यात

कोनले काय देनं व्हयी, ते माजम्हाईनच दिज्यात.

बाई ती बाईच हां म्हनाले काय लागंस

तिले जसं पटी तसं ती वागंस

बिचारा लक्सुमन भाऊना मांघे जंगलमा पयना

आनी हाऊ दपेल रावन झोपडीकडे वयना.

मंग कसाले इचारतस बिचारी सितानी दयना

हाऊ बाट्टोड रावन ते साधु बनीसनी हुबा रायना

सिता म्हने रेघना भायेर मी येवाउ नई

साधु म्हने रेघना भायेर येवासिवाय मी भिक ल्हेवाउ नई.

हावू म्हने मी भिक ल्हेवाऊ नई

सिता म्हने मी भायेर येवाउ नई

न्हाना तमासा से का!!!!

कोन मोडी यास्नी लढाई?

रावननी तोफांड सुरु करी दिन्हं

अल्लक निरंजन करीसनी भ्यावाडी दिन्हं

माय सिता रावनना तोफांडले भ्यायी गई

आनी आखेल रेघना भायेर ईsss गई

बस! माय सितानं पाऊल रेघना भायेर पडनं

आनी बट्ठं रामायन आठेच घडनं..

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६९२१)

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page