top of page

टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा जन्म

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा ज्या "उरल" पर्वताजवळ जन्माला आली तेच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचे प्राचीन काळातील वसतीस्थान होते याचे असंख्य पुरावे भारतीय, ग्रीक,चीनी व पारशी इतिहासामध्ये आढळून येतात.

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजामध्ये सध्या प्रचलित असलेली "अहिराणी" भाषा "टोचेरियन (Tocharian)" भाषेपासूनच जन्माला आली आहे असे देश-विदेशातील भाषातज्ञांचे संशोधन सांगते.

भाषातज्ञ श्री.ईव्हानॉव(Ivanov -1985) यांनी टोचेरीयन(Tocharian) भाषा "उरल" पर्वताजवळ बोलली जात होती हे सिद्ध केले आहे.(कृपया नकाशा पहा)

तर रेना,तास व रेन्हार्त(Rena - 1974, Tas -1988, Reinhart - 1990) यांनी टोचेरीयन (Tocharian) भाषा "अल्ताई" पर्वताजवळही बोलली जात होती हे सिद्ध केले आहे.

क्लोसन व पिनाल्त(Clauson - 1975, Pinault - 1998) यांनी सका/शक/Scythian" वंशाचे "तुर्की" लोकसुद्धा टोचेरीयन(Tocharian) भाषाच बोलत होते हे दाखवून दिले आहे.

पुलीब्लांक व लीन(Pulleyblank 1966, Lin 1998) यांनी टोचेरीयन(Tocharian) भाषेची सिनितिक (Sinitic) भाषेशी तर सापीर व ब्लाझेक(Sapir 1951, BlaZek 1984) यांनी टोचेरीयन(Tocharian) भाषेची तिबेटी व ब्रह्मदेशी (Tibeto-Burmese) भाषेशी जवळीक दाखवून दिली आहे.

अशा तर्हेने बहुधा सर्व "पौर्वात्य" व "पाश्चिमात्य' भाषांचा उगम शेवटी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "अहिराणी" भाषेची जन्मदात्री असलेल्या टोचेरीयन(Tocharian) भाषेत सापडतो आहे.

(कृपया भाषांच्या जननाचा तक्ता पहा)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page