top of page

अहिराणी,सायथीयन,पार्थियन व मेडीयन भाषा

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी" या जमातीचा इतिहास

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी" जमातीची "पणी/पर्णी" संस्कृती जगातील एक प्राचीन संस्कृती असून तिचा प्रसार अफगाणिस्तान,अरब देश, तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस असा सर्वदूर झालेला होता.

विविध भाषातज्ञांच्यामते हे "पणी/पर्णी" लोक आधी "पूर्व पार्थियन(सका/शक/Scythian/सायथीयन)" भाषेचा वापर करत होते.

"पार्थिया" प्रांत काबीज केल्यानंतर "पणी/पर्णी" लोकांची भाषा "पश्चिम पार्थियन(पेनूर)" झाली.

"पार्थिया" प्रांताजवळील "आर्मेनियन" लोकांवर "पणी/पर्णी" लोकांचा प्रभाव असल्याने "आर्मेनियन" भाषेमध्ये अधून मधून "पश्चिम पार्थियन(पेनूर)" शब्द डोकावत असतात.

भाषातज्ञ श्री.जस्टीन पेट्रो(कृपया फोटो पहा) यांच्या मते "पणी/पर्णी" लोकांची "पश्चिम पार्थियन (पेनूर)" ही भाषा "सका/शक/Scythian/सायथीयन" भाषा व "पार्थियन/मेडीयन" भाषा यांची सरमिसळ झालेली भाषा आहे.

आजही लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची "अहिराणी" ही भाषा गुजराती,मराठी व हिंदी भाषेची सरमिसळ झालेली भाषा आहे.

हा सर्व लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी" जमातीचा विविध कारणांमुळे झालेल्या स्थलांतराचा परिणाम आहे.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page