केरळचा सण "ओणम" मधली खवय्येगिरी
- dileepbw
- Aug 21, 2021
- 1 min read
केरळचा सण "ओणम" मधली खवय्येगिरी
नसलीने केरळचा सण "ओणम" याची पौराणिक कथा सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.आता मी तुम्हाला या सणामधली "खवय्येगिरी" सांगतो.
या सणासाठी केरळात घरांना रंग देऊन दर्शनी भाग फुलांनी शृंगारतात.गृहिणी घरापुढचे अंगण सारवतात व त्यावर बहुरंगी रांगोळी काढतात.गावात व रानात हिंडून फुले गोळा करणे हे मुलांचे काम असते. दहा दिवसपर्यंत अशी पुष्पशोभा केल्यावर श्रवण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची मृण्मय मूर्ती करून ता अंगणात बसवितात व त्याभोवती पुष्पशोभा करतात.प्रथम सर्व मिळून "आरप्पू" असा उद्घोष करतात.त्यानंतर वामनाची पूजा करतात. उत्सवाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते.
"ओनसद्या" या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही.तसेच तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, ओलण, रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू (ताक) यांनाही फार महत्त्व आहे.
चला तर मग "ओणम" चा नैवैद्य खायला !




Comments