top of page

चंद्रावरील शिवशक्ती नावाचा अर्थ

  • Aug 30, 2023
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलस्वामिनी

खालील प्रमाणे :-

१) श्री जोगेश्वरी देवी माता 👉मुंडी मांडळ

२) श्री म्हाळसा देवी माता 👉बेटावद

३) श्री मनुदेवी माता 👉 आडगांव

४) श्री एकवीरा देवी माता 👉 वणी

५) श्री जोगेश्वरी देवी माता 👉 जोगशेलू

६) श्री धनाई पुनाई देवी माता 👉जिरनेपाडा

७) श्री एकवीरा देवी माता 👉धुळे

८) श्री जोगेश्वरी देवी माता 👉बेटावद

९) श्री मठांबा देवी माता 👉 बेटावद

१०) श्री सुलाई देवी माता 👉उटांवद

११) श्री अन्नापूर्णा देवी माता 👉कापडणे

१२) श्री सारजा बारजा देवी माता 👉 बाहळ

१३) श्री खंबाबा देवी माता 👉 हिगंणी

१४) श्री पेडकाई देवी माता 👉चिमठाणे

१५) श्री आशापूरी देवी माता 👉 पाटण

१६) श्री भवानी देवी माता 👉वेळदा


ही सर्व "पार्वती,उमा,गौरी,शक्ती,उर्वी,हेमवती,देवी,काली,दुर्गा, अपराजिता,सती,आदी,पराशक्ती,मंगला,अपर्णा,कामाक्षी म्हणजे सृजनाची प्रेमदेवता,अंबिका,माता,माहेश्वरी,महामाता,भैरवी, रूद्रावतारी,भवानी,सृजनशीला,शिवाराधिनी म्हणजे शंकराची पूजक, रेणु,अन्नपूर्णा म्हणजे संपन्नतेची देवता,महाकाली म्हणजे विनाशकारी देवता या व अशा सहस्त्र नावांनी(संदर्भ - ललिता सहस्र नाम)ओळखल्या जाणार्‍या वैदिक धर्मातील "सृजनाच्या (निर्माणाच्या)" मातृदेवीची विविध रूपे मानली जातात व त्याच्या पूजकांना "शाक्त" पंथीय असे म्हणतात.


ही मातृदेवता निर्मिती,दैवी शक्ती,भक्ती,विवाह,मातृत्व,वात्सल्य, अपत्यप्राप्ती,सौख्य,एकरूपता यांचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे लाड सका(शाखीय) वाणी महिला सातत्याने "दुर्गा सप्तशती,देवी महात्म्य,देवी भागवत,देवी पुराण,कुमारसंभव" या धर्मग्रंथांचे पारायण करताना व प्रसंग विशेषी त्यांचे पूजन करताना आढळतात.


वैदिक धर्मात "पार्वती" ही पर्वराज हिमवन(हिमवंत) व मीना यांची कन्या (गिरिजा,नगजा,शैलजा,शैलपूत्री,माहेश्वरी, गंगामातेची व भगवान विष्णूची भगिनी(नारायणी),सृष्टीचा विनाश करणारा संहारक व पुन:निर्मिती करणारा सर्वत्राता देव "शंकर" याची पत्नी व गणेश व कार्तिकेय यांची माता समजली जाते.


पार्वती ही यज्ञात आहुती दिलेल्या शंकराची प्रथम पत्नी "सती" हीचा अवतार समजली जातो. पार्वती ही स्त्री(शक्ती) व पुरूष(शिव) यांना एकत्र आणणारी देवता समजली जाते."स्मार्त" पंथाचे लोक पार्वतीला "पंचायतन" चा भाग समजतात.तर "शैव" पंथाचे लोक पार्वतीला "शिवशक्ती" व सर्वांना सांधून मोक्षाकडे नेणारी देवता मानतात.


त्यामुळे प्रत्येक शिव मंदिरात शिवलिंगाच्या अर्ध्या भागात "योनी" च्या स्वरूपात पार्वतीची स्थापना केलेली आढळते.काही शिव मंदिरात ती चतुर्भूज "ललिता" या स्वरूपातही आढळून येते.सुवर्णासारखी झळाळणारी "पीत" कांती असलेली शांत स्वभावाची पार्वती "गौरी" म्हणून ओळखली जात असली तरी त्याला विरोधाभास असलेली रौद्र स्वरूप धारण करणारी कृष्णवर्णाची पार्वती "काली(शामा)" म्हणून ओळखली जाते. रूग्वेदात "रूद्राणी" म्हणून ओळखली जाणारी पार्वती सायनाचार्य यांच्या अनुवक व केन या उपनिषद धर्मग्रंथात "उमा(अंबिका)" म्हणून ओळखली जाते.तिच्याकडे ब्रह्मदेवाची शक्ती व वैदिक ज्ञान अग्नि,वायू व वरूण यांना प्रदान करणारी देवता म्हणून पाहिले आहे.


अनेक शिवमंदिरात पार्वतीचे दर्शन विविध स्वरूपात होते.त्यातील "हस्तमुद्रा" समजून घेण्यासारख्या आहेत.हाताची व बोटांची मुद्रा कंसात दाखविलेले भाव प्रकट करते कटक/कटीअवलंबिता/कटीसंस्थिता म्हणजे कटेवर दोन हात(आश्चर्य),अभया/हिरन(कौतुक व अभय),तर्जनी(विनाश),चंद्रकला(बुध्दिमत्ता), वरदा(इच्छापूर्ती)इ.


इ.स.पू.४०० ते इ.स.४०० ते या काळातील भारतीय धर्मग्रंथांचा (रामायण,महाभारत,पुराणे इ.) अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की रूग्वेदात वर्णन केलेली "रूद्राणी" म्हणजेच उपनिषदांमधील "उमा(अंबिका)" !


त्या नंतरच्या म्हणजे महाकवी कालिदासाच्या काळात "पार्वती" ही भारतातील "स्थानिक गिरीजनां" ची देवता म्हणून उदयाला आली.Hopkins या अभ्यासकाच्या मते हंस उपनिषद काळापासून पार्वती ही "स्थानिक गिरीजनांची देवता" म्हणून ओळखली जाऊ लागली.Weber या अभ्यासकाच्या मते शिव हे वैदिक देवता रूद्र व अग्नी यांचा अवतार आहे तर पार्वती हा उमा(अंबिका) यांचा अवतार आहे.Tate या अभ्यासकाच्या मते "शक्ती" चे प्रतीक असलेल्या शिवलिंगातील योनी हे "पार्वती" व लिंग हे "शिव" यांचे प्रतीक आहे.शिवलिंग हे स्त्री पुरूष "परस्परावलंबी" असल्याचे व "सृजनाच्या शक्तीचा स्त्रोत" असल्याचे प्रतीक आहे.या संदर्थात डाॅ.रां.चि.ढेरे यांचे संशोधन वाचण्यासारखे आहे.या काळात लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांनी दक्षिण भारतातील स्त्रिया व त्यांच्या धार्मिक संकल्पंनांचा मुक्तहस्ते स्वीकार केल्याचे दिसून येते.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page