top of page

"जागतिक क्ष किरण चिकित्सा दिन"

  • Nov 8, 2022
  • 2 min read

"जागतिक क्ष किरण चिकित्सा दिन"

आज दि.८ नोव्हेंबर हा "जागतिक क्ष किरण चिकित्सा दिन" ! त्या निमित्ताने या तंत्रज्ञानाचे संशोधक श्री.हेन्री बेक्युरल,श्री.पेअरी क्युरी,सौ. मेरी क्युरी व विल्हेम रोन्टजेन यांच्या स्मृतींना अभिवादन करू या व आपल्या स्मृती जागृत करू या.दुदैव असे की सौ.मेरी क्युरी ह्यांचे निधन या "किरणोत्सार" मुळेच झाले.असो.त्यांची ही आहूती सत्कारणीच लागलेली आहे.

आपले क्ष किरण तज्ञ डाॅ.के.आर.चौधरी सरांना कोण विसरेल ? "ब्रेन्स ट्रस्ट" या स्नेहसंमेलनातील अतिशय चित्तवेधक कार्यक्रमातील त्यांचा सहभाग नेहमीच अप्रतिम असायचा.डाॅ.के.आर.चौधरी सर फारच मिश्किल ! त्यांची एक आठवण माझ्या सदैव स्मरणात राहील.एका फिमेलचा Chest X-ray वाचताना त्यांनी तिचा नवरा Lt.handed आहे का Rt.handed असा प्रश्न विचारून आमची दांडीच उडवली होती.असो.त्या मानाने डाॅ.रहाळकर सर एकदमच शांत स्वभावाचे ! आजच त्यांची "पाचवी" पिढी बी.जे.मधे असल्याचे कळाले.असे उदाहरण विरळाच !

आपण रेसिडेंट असताना मेडिसिन डिपार्टमेंटमधे डाॅ.शिर्सीकर मॅडमने "सोनोग्राफी" सुरू केली होती. त्यामुळे "पॅंडोराचा बाॅक्स" जिवंतपणीच उघडायचे काम ससूनला सुरू झाले.Acute Abdomen साठी माझ्या भावाची "सोनोग्राफी" त्यांनी केली होती. "उच्चगामी" ध्वनीलहरींच्या गुणधर्मांचा वापर करून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता अवलोकन करणारे हे तंत्र माझ्या बंधूंचे मात्र निदान करू शकले नव्हते.त्यासाठी शेवटी माझी CCL ची कामी आली होती.असो.

तेव्हा "सोनोग्राफी" या तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ,व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला येण्यापूर्वीच करता यावे ही पध्दत रूढ झालेली नव्हती.त्याचप्रमाणे स्त्रीरोगांवर निदान व उपचार करणे हे देखील सुरू झालेले नव्हते.आपण २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतो. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

सोनोग्राफी तंत्रात १ ते १८ मेगाहर्ट्झ् इतकी कंप्रता असलेल्या अशा "उच्चगामी" ध्वनीलहरींचा वापर होतो.ट्रांसड्युसर हा प्रोबचे  कार्य करतो.त्वचेवर टेकवला असता उच्चगामी ध्वनीलहरींचे तो शरीरात प्रक्षेपण करून परावर्तित लहरींचे ग्रहण करून संगणकाला पाठवत असतो. संगणक त्याच्या साहाय्याने प्रतिमा निर्माण करतो. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दिसु न शकणाऱ्या ठिकाणावरून प्रतिमा निर्माण करता येतात. ध्वनिलहरी या क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ,गर्भाचे रोग,गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता शकतो.पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांची प्रत्यक्ष न पहाता तपासणी करता येते.स्त्रियांमधील "वंधत्व (इनफर्टिलिटी)" मध्ये त्यांच्या गर्भाशयाचा व नलिकांचा अभ्यास व या व्यतिरिक्त बिजांडामधील बिजांची वाढ व बीजधारणा(ओव्हयुलेशन स्टडी) यांचा अभ्यास केला जातो.यामध्ये स्पेशल प्रोब (टी.व्ही.) हा योनी मार्गात घातला जातो.यामुळे बिजे स्वच्छ व स्पष्ट दिसतात.स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते.

कुठल्याही संशोधनाचे जसे फायदे असतात तसेच तोटे देखील असतात."सोनोग्राफी" तंत्राने "गर्भलिंग निदान" सुरू झाले व "स्त्रीभृणहत्या" वाढल्या. सध्या या विषयावर मी एक लेखमाला सुरू केलेली आहे.ती अवश्य वाचा.शेवटी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा करून या समस्येला तोंड द्यावे लागले.

क्ष किरण चिकित्सेच्या पुढची पायरी होती ती "CT (computed axial tomography/CAT scan) ची ! या तंत्रज्ञानात Rotating X-ray tube व Row of detectors वापरून संगणकाच्या मदतीने सगळ्या अवयवांचे "छेद" तपासता येऊ लागले.याचे श्रेय जाते Allan MacLeod Cormack व Godfrey Hounsfield यांना ! Tomography" म्हणजे ग्रीक भाषेत tome (slice) व graphein(to write) ! तर Paul Edholm व Bertil Jacobson यांनी याला "Sinogram" असे नाव दिले.

सध्या नसली आपल्याला जी Radiography दाखवितो ती म्हाणजे MRI(Magnetic Resonance Imaging) ! या तंत्रज्ञानात Strong  magnetic fields,magnetic field gradients,radio waves इ.गोष्टींचा वापर करून अवयवांचे "छेद" तपासून पहाता येतात. कुठेही "क्ष किरणां" चा वापर नसल्याने किरणोत्सर्गाचा धोका संभवतच नाही.Nuclear magnetic resonance(NMR) व NMR spectroscopy असे नवीन प्रकार त्यात आले आहेत. Paul Lauterbur त्याला "Zeugmatography" असे म्हणत असे. त्यातूनच त्यांनी Peter Mansfield यांच्या सहकार्याने "Echo-planar imaging(EPI) technique" शोधून काढले. त्याबद्दल त्यांना २००३ साली "नोबेल पारितोषिक" बहाल करण्यात आले.आजच्या "जागतिक क्ष किरण चिकित्सा दिन" निमित्त आपल्या सर्वांतर्फे त्यांना त्रिवार वंदन !


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page