top of page

जनकल्याण रक्तपेढी,महाड महापूराने आपत्तीग्रस्त होण्याची कारणे

  • Aug 7, 2021
  • 1 min read

"जनकल्याण रक्तपेढी,महाड महापूराने आपत्तीग्रस्त होण्याची कारणे"


सुनील आगरकरने म्हटल्याप्रमाणे "Drainage System" चांगली नसेल तर ओला मैला साठून राहतो व तिथे डासांची व विषारी वायूंची निर्मिती होते.जे तुमच्या स्वास्थ्यास हानिकारक असते.त्यामुळे कार्यक्षम drainage system ला सर्वोच्च प्राथमिकता दिली पाहिजे. याचा अनुभव समस्त महाडकर घेत आहेत.काल दिवसभरात झालेले रक्त संकलन Haemorrhagic Dengue च्या फक्त एकाच रूग्णाने संपविले व रक्तपेढी पुन्हा "रिती" झाली.त्यामुळे आज महाड मधील बांधकाम व्यावसायिकांची संघटना रक्तपेढी रक्ताने भरण्यासाठी सरसावलेली आहे.


महाड शहर हे "चवदार तळे" असलेले शहर ! कोणेएके काळी दलित समाज बांधवांना पिण्याचे पाणी सुध्दा घेऊ न देणारे महाडकर आज दलितांना देखील वेळेवर रक्त मिळावे यासाठी "रक्ताचे पाणी" करताना दिसत आहेत.नूँर मंझील ही मुस्लिमांची पाच मजली इमारत गेल्यावर्षी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि जनकल्याण रक्तपेढी,महाड आपत्तीग्रस्त मुस्लिम बांधवांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली व अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुस्लिम बांधवांचा "रक्तदानातला टक्का" अनेकपटींने वाढला आहे.या महापूराच्या आपत्तीच्या निमित्ताने का होईना पण महाडच्या दलित समाज बांधवांचा सुध्दा "रक्तदानातला टक्का" वाढावा.हीच प्रभुचरणी प्रार्थना !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page