top of page

जनकल्याण रक्तपेढी,महाडची काळरात्र-दि.२२ जुलै,२०२१

  • Aug 4, 2021
  • 1 min read

जनकल्याण रक्तपेढी,महाडची काळरात्र-दि.२२ जुलै,२०२१


दि.२२ जुलै,२०२१ ची सकाळ ! रात्रपाळीचा तंत्रज्ञ व एक निवासी कार्यकर्ता सकाळी उठून पहातात तो काय ! रक्तपेढीच्या पार्किंगमधे पुराचे पाणी भरलेले. घाबरून जाऊन त्यांनी शेजारीच रहाणार्‍या रक्तपेढीच्या निरीक्षकांना पाचारण केले.ते कमरे एवढ्या पाण्यातून कसेबसे रक्तपेढीत पोहोचतात न पोहोचतात तोच पाण्याने झपाट्याने पहिला मजला गाठला.


पूर्वानुभव लक्षात घेऊन उंचावर ठेवलेला जनित्र (Generator) देखील पाण्यात संपूर्णपणे बुडाला.आता तर पर्यायी वीज पुरवठाच बंद पडल्याने रक्तपेढीचे दैनंदिन कामच थांबले.रक्त,उपकरणे,केमिकल्स,कागदपत्रे इ.गोष्टी पळापळ करून वरच्या मजल्यावर हलविल्या.पण पाण्याची पातळी इतक्या वेगाने वाढत गेली की मनुष्यबळ कमी पडले. त्यामुळे रेफ्रीजरेटर्स सारखी जड उपकरणे पाण्याखाली गेली.ना बाहेरचे कोणी आत येऊ शकेना,ना आत अडकलेले कोणी बाहेर जाऊ शकेना ! एकच "हबेलहंडी" उडाली.


दुपार होऊ लागली तशी पाण्याची पातळी वाढतच गेली. पाणी १७-१८ फुटा पर्यंत चढले.अग्निशमन दलाच्या होड्या देखील हताश झाल्या.डोळ्या देखत रक्ताचे नुसते "पाणी पाणी" झाले.नेत्रांमधील पाण्याने देखील "धोक्याची पातळी" ओलांडली व ते ओसंडून वाहू लागले.हे दोन्ही महापूर ओसरायला दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली. पावसाचे पाणी तर हटले.पण डोळ्यातील पाण्याचे काय ?


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page