"जीना लोलोब्रिगिडाला भावपूर्ण श्रध्दांजली"
- Sep 2, 2023
- 3 min read
"जीना लोलोब्रिगिडाला भावपूर्ण श्रध्दांजली"
© दिलीप वाणी,पुणे
आरतीने ९५ वर्षांची इटालियन अभिनेत्री व "कम सप्टेंबर" या चित्रपटाची नायिका "जीना लोलोब्रिगिडा" गेल्याचे कळवले अन मनात एक सूक्ष्म कळ उमटली."Altri Tempi (Infidelity, 1952)" या इटालियन सिनेमातील भूमिकेमुळे "sex symbol" म्हणून प्रसिध्द झालेली "जीना"
"International sex symbol", "Mona Lisa of the 20th Century" तसेच "The Most Beautiful Woman in the World" म्हणून ओळखली जात असे.
ही "जीना" नसलीच्या देखील "ह्रदयातली कळ" असावी. ती त्याच्या "She was a stunning beauty" या शब्दात आज बाहेर पडली."जीना"तर नेहेमी म्हणायची "We are all born to die.The difference is the intensity with which we choose to live." ! ती खरोखरच एक अभिनेत्री म्हणून,एक राजकारणी म्हणून व एक पत्रकार म्हणून देखील अशाच intensity ने जगली ! विशेष म्हणजे "जीना" ने २०२२ साली इटलीची निवडणूक देखील लढविली होती.पण तिला त्यात यश आले नाही. तिला आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली !
"जीना" म्हणायची "A woman at 20 is like ice, at 30, she is warm and at 40, she is hot." ! ती स्वत: मात्र ९५ वर्षांची होईपर्यंत माझ्यासाठी "hot" च होती.माझे जन्मवर्ष १९५५ सालच्या "The World's Most Beautiful Woman" या चित्रपटामुळे "जीना" संपूर्ण जगात याच नावाने ओळखली जाऊ लागली ते पार मरेपर्यंत !
मला ती आठवते ती "कम सप्टेंबर" ची धून ऐकताना ! "नाटू नाटू" या भारतीय गाण्याप्रमाणेच या चित्रपटासाठी तिला "Golden Globe" पुरस्कार प्राप्त झाला होता.National Italian American Foundation (NIAF) चा Lifetime Achievement Award हा व असे असंख्य सन्मान "जीना" ला प्राप्त झाले होते.या सर्व सन्मानांचा व दागिन्यांचा लिलाव करून "जीना" ने US$5 million एवढी मोठी रक्कम माझ्या आवडत्या "stem-cell therapy research" साठी देणगी दिले म्हणून ती मला अधिकच प्रिय आहे.
"जीना" ची मी बी.जे.त शिकत असतानाची आठवण म्हणजे तिने मुंबईला दिलेली भेट ! तसेच तिची वारंवार आठवण करून देणारी भारतीय अभिनेत्री म्हणजे "करिश्मा कपूर" ! तसेही घरचे तिला लाडाने "जीना लोलोब्रिगिडा" म्हणजे थोडक्यात "लोलो" असेच म्हणतात !
१९९७ साली फिल्म जगताला रामराम ठोकून "जीना" पत्रकारितेमधे शिरली.चित्रकला व शिल्पकला शिकली. कलासक्त जीवन जगलेली "जीना" प्रेम देखील त्याच विलक्षण intensity ने करायची.जगभर असंख्य चाहते असलेल्या "जीना" ची प्रेमप्रकरणे पण अनेक ! "जीना" साठी Slovenian doctor Mirko Skofic इतका "वेडा" झाला की आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून त्याने तिचा मॅनेजर म्हणून नोकरी स्विकारली. १९४९ साली तिच्याशी विवाह केला.शेवटी १९७१ ला हे प्रकरण संपले.
"जीना" च्या एका प्रेमप्रकरणाचा मी अप्रत्यक्ष साक्षीदार आहे. १९८८ साली मी युरोप दौर्यावर असताना फ्रांस जवळील "माॅंटे कार्लो" या देशात जुगार खेळायला गेलो होतो.त्यावेळी माझी मार्गदर्शिका होती "जीना" सारखीच एक मादक "आयलिन" नावाची इटालियन तरुणी ! तिने मला
"जीना" चे वयाच्या ७९ व्या वर्षी ४५ वर्षीय Spanish businessman श्री.Javier Rigauy Rafols याच्याशी जुळलेले प्रेमप्रकरण अगदी रंगवून रंगवून सांगीतले होते.तेव्हा ते अगदीच ताजे प्रकरण होते.त्याची पराणिती २००६ साली विवाहात झाली खरी,पण हा विवाह दीर्घकाळ टिकला नाही व त्यातून अनेक कायदेशीर कटकटी मात्र उभ्या राहिल्या.हे मात्र खरे !
"जीना" ची अजून एक आठवण सांगतो.आपण सर्वजण नुकतेच MBBS ला प्रवेशित झालेले होतो.त्यावेळी कृष्णा शहा नावाचे एक निर्माते "शालिमार" नावाचा एक भव्य दिव्य चित्रपट निर्माण करायच्या तयारीत होते.त्यासाठी "Trapeze" या गाजलेल्या चित्रपटाची इटालियन नायिका "जीना" भारतात पोहोचली देखील ! कृष्णा शहांचा कार्यभाग साधला गेला.त्यांनी तिचा "चोळी-बांगडी" देऊन सत्कार केला व लगेच "परत-पाठवणी" करून ही भूमिका त्यांना परवडेल अशा दुसर्या "जीना(जीनत अमन)"ला देऊन टाकली.असो.
अशोक चोपरा व बनी रुबेन नावाच्या पत्रकारांनी "जीना" च्या या भारत भेटीला "The battle of the BOOBS" म्हणून "वारेमाप" प्रसिध्दी मिळवून दिली होती.हे मात्र खरे ! या वर "जीना" ची प्रतिक्रिया होती :-
"Popularity has a bright side, it unlocks many doors. But the truth is that I don't like it very much because it changes the private life into a very small thing".
मी पनवेलला "शालिमार" या चित्रपटाचे धर्मेंद्र,शम्मी,प्रेमनाथ व झीनत यांच्यावर चित्रीत झालेले काही शाॅट्स पाहिलेले आहेत.पण "जीना लोलोब्रिगिडा" काही प्राक्तनात नव्हती.हा हंत हंत !
Rex Harrison व John Saxon हे अन्य कलाकार पण थेट पडद्यावरच भेटले.असो.त्यावेळी "जीना" बाई दिल्लीला देखील गेल्या होत्या.ती बातमी काय मथळ्याने छापून आली होती पहा.
"The appearance of the Italian sexpot-turned-photographer Gina Lollobrigida saw a sudden and unprecedented turnout of pressmen at a routine PIB Press conference” causing an official to comment that “not for presidents and monarchs and leading statesmen of the world had so many members of the Press turned up all at once!” आहे की नाही गंमत ?
मरावे परी किर्तीरूपी उरावे ! "जीना" अगदी तशीच जगली.ती मेल्यावर तिच्या देशाचा सांस्कृतिक मंत्री
(Hon.Gennaro Sangiuliano) काय म्हणाला पहा.
“Farewell to a diva of the silver screen, protagonist of more than half a century of Italian cinema history. Her charm will remain eternal.” तर हाॅलीवूड पहा काय म्हणते ते !
"The exotic charms of the dark-haired, independent beauty made her an international sex symbol of postwar cinema.”
हाॅलीवूडस्टार Humphrey Bogart म्हणतो-
"She made Marilyn Monroe look like Shirley Temple”.
पत्रकार "जीना" चा एक जबरदस्त "किस्सा" सांगतो.क्युबाचे अध्यक्ष "Fidel Castro" यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्यासाठी ही बया तब्बल बारा दिवस त्यांच्याबरोबर राहिली. त्याकाळातील तिचे मत ऐका :-
"We spent 12 days together.He didn’t interest me as a political leader but as a man.He realised that I hadn’t gone there to attack him and he readily accepted me.”
अशा या भन्नाट "सेक्स क्वीन" ला भावपूर्ण श्रध्दांजली !
Comments