top of page

तळीये

  • Aug 4, 2021
  • 1 min read

"महाड जवळील तळीये गावातली दुर्घटना व रक्तपेढीची असहायता"


प्रकाश चिरमाडेने पाठविलेला जनकल्याण रक्तपेढी,महाड पासून जेमतेम १५ कि.मी.अंतरावर असलेल्या,६३७ लोकवस्ती असलेल्या तळीये,ता.महाड,जि.रायगड या गावावर कोसळलेल्या दरडीच्या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या ८४ व्यक्तींच्या तेराव्याच्या विधीची ह्रदयद्रावक ध्वनिचित्रफीत पाहून मन अक्षरश: पिळवटून निघाले.


दि.२२ जुलैला अतीवृष्टीमधे जसे जनकल्याण रक्तपेढी,महाडचे अपरिमीत नुकसान झाले त्यापेक्षा भयानक नुकसान या "तळीये" गावाचे झाले आहे.एकूण ३२ घरे दरडीखाली गाडली गेली असून ८४ लोक त्यात गाडले गेले आहेत.त्यात २२ जण शाळेत शिकणारी मुले आहेत.शाळा वाचली पण मुले गेली ? आता कोणाला शिकवणार ?


कलेक्टर श्रीमती निधी चौधरी यांनी आता पाऊस थांबला असला तरी ग्रामस्थांना प्यायला पाणी देखील नसल्याचे कळविले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतून National Disaster Response Force (NDRF) व जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांना घरे बांधून देण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


त्यातच तळीये गावा जवळील बीरवाडी येथे एका केमिकल फॅक्टरीतून विषारी वायुची गळती सुरू झाली व जनकल्याण रक्तपेढी,महाड मधील सर्वांचीच पाचावर धारण बसली.कारण कुणाला रक्ताची गरज भासल्यास रक्तपेढीच कार्यरत नव्हती.












 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page