थॅलेसेमिया मुक्त वाणी समाज"
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासाचे संकलक पुण्याचे पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव, भडगावकर) केंद्र सरकारच्या निमंत्रणावरून मुंबई येथे "जागतिक हिपाटायटिस दिन" या काविळ प्रतिबंधाच्या जागतिक प्रचार मोहिमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.
त्यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जागतिक किर्तीचे सिने अभिनेते श्री.अमिताभ बच्चन यांचे भाषण समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या माहिती साठी सोबत "यू ट्यूब लिंक"
(https://www.youtube.com/watch?v=g2OjAR5YMMk&ebc=ANyPxKorH9GINrSWswY9N8VEDUZ3Ug_UG8KO7L35xQYBeGuXmEmQPK5xdatriaxtknvQPQTRgfpZSG1lu0RDVTbOIazsNsVUww" ) या स्वरूपात जोडत आहे. अवश्य ऐका.
लाड सका(शाखीय) वाणी समाजामध्ये सुमारे ५% समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे वाहक असून ते या बाबत अनभिज्ञ आहेत. "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी केल्यास आपण "वाहक" असल्याचे लगेच लक्षात येईल. दोन वाहकांनी परस्परांशी विवाह टाळल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाज हा सहजपणे "थॅलेसेमिया मुक्त समाज" म्हणून गणला जाईल.
स्वत: श्री.अमिताभ बच्चन व डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर) दोघेही "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे वाहक असून त दोघेहीे या रक्त विकाराच्या प्रतिबंधासाठी कटिबध्द आहेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६४३२)




Comments