top of page

थॅलेसेमियामुक्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज

  • dileepbw
  • Aug 20, 2021
  • 2 min read

"थॅलेसेमियामुक्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज"


सुभाष सुराणाची कै.मा.डाॅ.नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली वहाणारी स्वरचित कविता वाचून मला मी माझ्या समाजातील अंधश्रध्दा निर्मूलनासाठी केलेल्या अल्प-स्वल्प कार्याची आठवण झाली.अत्यंत देवभोळा व धार्मिक असलेल्या माझ्या समाजाला विज्ञानाच्या वाटेवर नेणे हे काम सोपे नव्हते.त्यांच्या श्रध्दा,रिती-रिवाज, सण-वार यांना धक्का न लावता त्यांना "थॅलेसेमिया निर्मूलना" च्या कार्याकडे वळविण्यासाठी मी केलेला एक अल्पसा प्रयत्न सांगतो.


भारत देशाच्या विकासाचा मार्ग ग्रामीण भागातून जाताे. कारण "खेडी" हा भारत देशाचा आत्मा आहे.त्यामुळे खेड्यांचा विकास झाला तर आपोआपच देशाचा देखील विकास होणार आहे. ग्रामपंचायत या "खेडे" विकासाच्या माध्यमातून खालील तब्बल ३२(व त्यातही ५० टक्के महिला) लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांना आपआपल्या खेड्यांचा व पर्यायाने देशाचा विकास करण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे :-


1-सौ.तेजस्विनी स्वप्निल मुसळे (अभोणा)

2-श्री.राहुल सुधाकर देशमुख(सोनगीर)

3-श्री.परेश चंद्रकांत राणे (निजामपूर)

4-सौ.शोभा धर्मराज चिंचोले(निजामपूर)

5-श्री.विजय रामचंद्र राणे(निजामपूर)

6-श्री.महेंद्र गोकुळ राणे(निजामपूर)

7-श्री.पंकज भाऊ खोडके (करमुड)

8-श्री.निंबा वसंत धामणे(लोहनेर)

9-श्रीमती विजयाताई दत्तात्रेय मेतकर (लोहनेर)

10-श्री.देवेंद्र भिला देव(हरेश्वर पिंपळगाव)

11-सौ.निर्मला राजेंद्र माकडे(बहाद्दरपूर)

12-श्री.सुनील रघुनाथ वाणी (बहाद्दरपूर)

13-श्री.आबासाहेब अनिल नामदेव राणे (दिघावे)

14-श्री.रमेश राघो मेखा(सायगाव)

15-सौ.मंजुळा पुरूषोत्तम चिंचोरे(गाळणे)

16-श्री.वसंत काशिनाथ शिनकर(खेडगाव खुर्द ता.भाडगाव)

17-श्री.राकेश सुभाष शिरोडे (बहाळ)

18-सौ.प्रीती सचिन कोठावदे(ताहाराबाद)

19-सौ.मनीषा प्रकाश कोठावदे (देवी,शिंदखेडा)

20-सौ.वैशाली राजेंद्र गहिवड (दातरती गंगापूर)

21-श्री.मुकेश सुभाष सोनकुल(सामनेर)

22-सौ.रुपाली प्रशांत वाणी(गाळणे)

23-श्री.कमलाकर रघुनाथ ततार(तळवाडे मालेगाव)

24-श्री.किशोर सुधाकर शेंडे(रावळगाव)

25-सौ.मनीषा संजय वाणी (लोहटार)

26-सौ.जयश्री बारकू वाणी(तामसवाडी)

27-सौ.अश्विनी वना वाणी (वाघळी)

28-श्री.भावेश मुकुंद कोठावदे(टाकळी)

29-सौ.शीतल अनिल दुसे (टाकळी)

30-सौ.चंद्रकला पांडुरंग सोनजे (झोडगे)

31-सौ.सीमा संदीप बधान (नवी शेमळी)

32-सौ.पुष्पा विजय शिनकर (जुनोने,कन्नड-चाळीसगाव रोड)


या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !


या सदस्यांमधूनच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे धुरंधर राजकारणी,आमदार व खासदार घडावेत हीच शुभकामना !


लाड सका(शाखीय) वाणी समाजातील या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार "लाडशाखीय वाणी मित्र मंडळ, नाशिक" या संस्थेने दि.३१ जानेवारी,२०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता माहेरघर मंगल कार्यालय, खुटवड नगर,नाशिक येथे आयोजित केला आहे.त्यांचे देखील मन:पूर्वक अभिनंदन !


इसवी सनाच्या "विसाव्या" शतकात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे पूर्वाश्रमीचे वास्तव्य असलेल्या "लाड देश/लाट देश/दक्षिण गुजरात" या प्रांतामधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले.त्यावेळी महाराष्ट्रातील "खानदेश" प्रांतामधील विविध खेड्यामध्ये "अलुतेदारी-बलुतेदारी" अशी "सामाजिक व आर्थिक व्यवहाराची "विशिष्ट समाज रचना अस्तित्वात होती.या पद्धतीचा उगम हा भारतीय खेड्यातील "सामाजिक व आर्थिक गरजा" यातून झालेला होता आणि तिला अनन्य साधारण महत्व मिळाले होते.या व्यवस्थेत शेती करणारा "कुणबी", तर त्याला शेती करिता आपल्या "कले" ने मदत करणारे "कारू(बलुत्या/बलुतेदार - एकूण १२ महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, पाटील, कोळी,गुरव व चौगुला)" व ज्याच्या वाचून शेतीचे काम अडत नाही पण अन्य बिगरशेतीची कामे अडतात तो "नारू(अलुत्या/अलुतेदार - एकूण १२ - तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी,गोंधळी, भाट, गोसावी, वाजंत्री, कलावंत व भोई)" अशी श्रम विभागणी होती.

सर्वजण एकमेकांशी "जवळकी" च्या नात्याने वागत.या परिस्थितीने सर्वांना दीर्घ काळ एकत्र ठेवले.


"कारू(बलुत्या/बलुतेदार)" व "नारू (अलुत्या/अलुतेदार)" लोकांना त्यांचा मेहेनताना "पिका" च्या अथवा "अन्य स्वरुपा" त मिळत असे."पाटील(राजा) व कुलकर्णी (प्रधान)" या सरकारी वतनदारांकडे गावाच्या संरक्षणाची, व्यवस्थेची व सरकारी वसुलीची जबाबदारी असे.(संदर्भ:- गावगाडा - ह.वि.मोटे प्रकाशन,मुंबई तृतीय आवृत्ती ,१९५९ लेखक:- श्री.त्रिंबक नारायण आत्रे, मामलेदार, जि. अहमदनगर)


महाराष्ट्रातील "खानदेश" प्रांतामधील या तत्कालीन "अलुतेदारी-बलुतेदारी" पद्धतीत "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजा" ला या सर्वांचा "आर्थिक पुरवठादार" असे स्थान मिळाले होते.ही परंपरा ध्यानात ठेवून सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आपआपल्या खेड्याचा "आर्थिक विकास" करावा.हे विनम्र आवाहन !


तसेच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज हा "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्तविकारापासून मुक्त करण्यासाठी कटिबध्द व्हावे.ही नम्र विनंती.



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page