top of page

"नववर्षाच्या "राग-रंग" मय हार्दिक शुभेच्छा"

  • dileepbw
  • Dec 31, 2023
  • 1 min read

"नववर्षाच्या "राग-रंग" मय हार्दिक शुभेच्छा"

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नववर्षाची "राग-रंग" मय ही दिनदर्शिका आपल्या "अंतरंग" मधे तरल "तरंग" निर्माण करो याच अपेक्षा ! आमच्या "राग-रंग, तरंग-अंतरंग" या आगामी ग्रंथ लेखनासाठी आपल्या शुभेच्छा अपेक्षित !

"राग-रंग, तरंग-अंतरंग" या ग्रंथ निर्मितीच्या संकल्पाच्या निमित्ताने शांता शेळके यांची एक कविता सादर करतो.

कुठले पुस्तक कुठला लेखक

लिपी कोणती कसले भाकित

हात एक अदृश्य उलटतो

पानामागून पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागतां

दाटून येते मनामधे भय

पान हे नवे यात तरी का

असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर

कणाकणाने खचते वाळू

तरी लाट ही नवीन उठता

सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा

पुसते डोळे हसतां हसतां

उभा इथे मी पसरुन बाहू

नवीन वर्षा तुझ्या स्वागता

BJMC-1973 Batch चे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.दोनशेच्या आपल्या बॅचमधील तब्बल ३१ मोती गळाल्याचे वाचून अतीव दु:ख झाले."राग-रंग, तरंग-अंतरंग" हा माझा ग्रंथ पहायला किती मोती शिल्लक रहातील याची सतत भ्रांत असते.वाचा.

"निरंतर माळेतून,एक मोती गळतो आहे"

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

काही चेहरे वजा अन्

बर्‍याच आठवणी जमा..

वयाचा पक्षी

आभाळी दूर उडतो आहे ..

हलकी हलकी उन्हे

अन् आक्रसलेल्या रात्री..

गेलेल्या क्षणांवर

पडदा हळूहळू पडतो आहे..

मातीचा देह

मातीत मिळण्यापूर्वी..

हर मुद्द्यावर

इतका का आडतो आहे..

अनुभवण्या पूर्वीच

सुटून जात आहे आयुष्य..

एक एक क्षण जणू

ढग बनून उडतो आहे..

तारखांच्या जिन्यातून

डिसेंबर पळतो आहे ..

माणसं भेटत गेली,

मला आवडली आणि

मी ती जोडत गेलो !

चला...

या वर्षाचा हा

अखेरचा आठवडा

आपल्या या प्रेमळ मैत्रीबद्दल

खुप सारे धन्यवाद..!!

तुमच्या या मैत्रीची साथ

यापुढे ही अशीच कायम असू द्या..

नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page