top of page

पूर्वजांच्या धार्मिक संकल्पना

  • dileepbw
  • Sep 9, 2022
  • 2 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांच्या धार्मिक संकल्पना समजावून घेण्यासाठी Kultur Kontakt यांच्या आर्थिक सहाय्याच्या पाठिंब्यावर IVAN MARAZOV यांनी संपादित केलेले,Dmitriy Raevskiy, Kiril Prashkov, Nedyalko Barakov,Nedyalka Chakalova या लेखकांनी लिहिलेले "SCYTHIAN MYTHOLOGY" हे पुस्तक(ISBN 954-8250-02-0) इ.स.१९९३ साली Secor Publishers, Sofia, Bulgaria या प्रकाशकाने प्रसिध्द केले आहे.समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी ते अवश्य वाचावे.ही नम्र विनंती.

कोणतीही संस्कृती समजावून घ्यायची असेल तर त्या संस्कृतीमधील धार्मिक संकल्पना(mythology) समजावून घेणे आवश्यक आहे.

रशियन संशोधक E.M.Meletinskiy यांच्यामते विश्वाच्या उत्पत्ती तसेच रचने संबंधीच्या धार्मिक संकल्पना त्या त्या संस्कृतीची सामाजिक व राजकीय रचना ठरवित असते.त्यामुळे "सका/शक/Scythian" लोकांची संस्कृती समजावून घ्यायची असल्यास त्यांच्या

धार्मिक संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे."सका/शक/Scythian" लोक निरक्षर असल्याने त्यांचे धार्मिक साहित्य लिखित स्वरूपात आढळून येत नाही.त्यांची इंडो-इरानियन गटातील "सका/शक/Scythian" भाषा समजावून घेण्यासाठी देखील ग्रीक लिपीचीच मदत घ्यावी लागते.या भाषांच्या अभ्यासावरून व गेल्या २०० वर्षात विविध ठिकाणी झालेल्या खालील उत्खननांवरून असे लक्षात येते की आर्यपूर्व काळातील "सका/शक/Scythian" लोकांच्या धार्मिक संकल्पना या बर्‍याचशा आर्य,इराणी व ग्रीक धार्मिक संकल्पनांशी मिळत्या जुळत्या आहेत.

वैदिक संस्कृतीमधे लाड सका (शाखीय) वाणी समाजाला "वैश्य" या वर्णात स्थान दिलेले असून समाजाचे भरण-पोषण करणारे शेती, व्यापार व सावकारी हे व्यवसाय त्यांना ठरवून देण्यात आलेले आहेत. लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या धार्मिक संकल्पनांमध्ये त्यांना काय स्थान होते हे समजावून घ्यायचे असेल "सका/शक/Scythian" लोकांमधील वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था (Ethnogencsis) समजावून घ्यावी लागेल.

"सका/शक/Scythian"

लोकांचा पहिला दैवी पुरूष Targitaos याला Arpoxais,Lipoxais व Kolaxais नावाचे तीन दैवी पुत्र झाले.त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना अनुक्रमे समाजाचे भरण-पोषण, पशुपालन व संरक्षण ही कामे वाटून देण्यात आली.परंपरेने Arpoxais चे वंशज शेतकरी(वैश्य),Lipoxais चे वंशज पशुपालक व Kolaxais चे वंशज सैनिक(क्षत्रिय) झाले.काळाच्या ओघात ते आपल्या व्यवसायानुसार Napoi/Traspics (Community/प्रजा),Auchatai(Nomads) व Paloi/Paralatac/Royal Scythians(Warriors) म्हणून ओळखले जाऊ लागले.जगातील अनेक संस्कृतींमधे अशी सामाजिक रचना आढळून येते.

"सका/शक/Scythian" लोकांची ही सामाजिक रचना व लाड सका (शाखीय) वाणी समाजाचा पारंपारिक व्यवसाय लक्षात घेता "सका/शक/Scythian" लोकांचा पहिला दैवी पुरूष Targitaos याचा Arpoxais हा दैवी पुत्र हाच लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचा पूर्वज असावा असे म्हणता येते.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page