top of page

पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - सह्रदय वर्गमित्र व परिचित

  • Aug 12, 2021
  • 1 min read

"पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - सह्रदय वर्गमित्र व परिचित"


करोना काळात सुरू झालेल्या आपल्या गटामुळे काही वर्गमित्र जवळ जवळ रोजच संपर्कात आहेत.गेले काही

दिवस मी "काव्य-शास्त्र-विनोद" या माध्यमातून विविध विषयांवर लिखाण करीत आहेत.खूप जणांचा त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे.गेल्या ४०-५० वर्षात आपण जेवढे एकमेकांना ओळखले नव्हते तेवढे या वर्षा दोन वर्षात आपण एकमेकांना ओळखू लागलो आहोत. अनेक जाती-धर्माचे,राजकीय विचारांचे वर्गमित्र बर्‍यापैकी दीर्घकाळ एकमेकांच्या संपर्कात राहिल्याचे दृश्य दिसते आहे.कारण या गटाने काही पथ्ये आवर्जून पाळलेली आहेत. या पथ्यांच्या चौकटीत राहून पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन कसे करावे या विचाराने ग्रस्त असतानाचा एक विचार मनाला चाटून गेला.


रक्तसेवा ही जात-पात,धर्म,पंथ,राजकारण या गोष्टींच्या पलीकडचे मानवसेवेचे एक राष्ट्रीय कार्य आहे याची सर्वांनाच जाणिव असल्याने सर्व जण यथाशक्ती नक्कीच मदत करतील अशी आशा वाटली व तसे आवाहन प्रसृत करताक्षणी सर्वात प्रथम प्रतिसाद आला तो कट्टर नास्तिक असलेल्या वर्गमित्राचा ! त्या नंतरचा प्रतिसाद आला तो राजकीय मतभेद असलेल्या वर्गमित्राचा ! मनोमन खात्री पडली की हे मानवसेवेचे कार्य सर्वांना मनापासून भावलेले आहे व सर्वजण त्याला अल्प-स्वल्प का होईना,पण मदत करणारच ! गेल्या आठवड्यातील प्रतिसाद पहाता याची प्रचिती येते.


अजूनही दोन तृतीयांशपेक्षा जास्त वर्गमित्रांचा प्रतिसाद आलेला नाही.त्यांनी आजच या आपत्तीग्रस्तांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.हे विनम्र आवाहन !


"एक रूपया,लाख रूपया" !



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page