प्लेबॉय "शम्मी कपूर"
- dileepbw
- Sep 23, 2021
- 2 min read
Updated: Sep 3, 2022
आज दि.१४ ऑगस्ट हा श्री.शमशेर राज कपूर उर्फ खेळकर प्लेबॉय "शम्मी कपूर" यांचा स्मृतिदिन ! या प्लेबॉयला आयुष्यात एकदा नाही तर दोनदा व ते ही व्यक्तिश: भेटण्याची संधी मिळाली.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
इ.स.१९५० आणि इ.स.१९६० च्या दशकांमध्ये प्लेबॉय "शम्मी कपूर" चे अनेक यशस्वी चित्रपट झळकले.त्या काळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य (दुसरे दोन - राज कपूर आणि शशी कपूर) ! तीनही भावंडांनी आपल्या वडिलां प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले.
शम्मीने अनेक विनोदी,खेळकर,तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. इ.स. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा "एल्विस प्रिसली" म्हणत.
शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. विशेषत: जंगली (इ.स. १९६१) मधील "याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे" हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे.तीसरी मंजिल (इ.स. १९६६) हा विजय आनंद दिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.इ.स. १९७० च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे त्याची हिरोगिरी संपुष्टात आली.अंदाज (इ.स. १९७१) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला.जंगली (इ.स. १९६१) आणि ब्लफ मास्टर (इ.स. १९६४) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (इ.स. १९७५) मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले.
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता(इ.स. १९६२ ,प्राध्यापक (फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार(इ.स. १९६८, ब्रम्हचारी),फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार( इ.स.१९८२,विधाता), फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार(इ.स.१९९५),कलाकार पुरस्कार(इ.स.१९९८), झी सिने अॅवॉर्ड फ़ॉर लाइफटाइम अचीवमेंट(इ.स. १९९९), स्टार स्क्रीन लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड(इ.स. २००१), इनव्हॅल्युएबल काँट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा - IIFA कडून(इ.स. २००२ - २००२), लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड - बॉलिवुड मूव्ही अॅवॉर्ड्स् तर्फे(इ.स. २००५),लाइफटाइम अचीवमेंट अॅवॉर्ड (इ.स. २००८), भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय मनोरंजन उद्योगाला दिलेल्या बहुमोल योगदानासाठी शम्मी कपूर हे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (फिक्की)च्या 'लिव्हिंग लेजेंड अॅवॉर्ड'ने पुरस्कृत असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते.
अशा या "प्लेबाॅय " शम्मी कपूर यांना भेटण्याची संधी मला मिळाली ती मी इ.स.१९७१ साली पनवेलला अकरावीत शिकत असताना ! त्यावेळी रमेश सिप्पी "अंदाज" या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी महिनाभर पनवेलला तळ ठोकून होते.या काळात शम्मी,हेमा,राजेश खन्ना,सिमी गरेवाल,अजित,अरूणा इराणी,अचला सचदेव,रूपेश कुमार,डेव्हिड,रंधवा,बेबी गौरी व मास्टर अलंकार इ.कलाकार आळीपाळीने हजेरी लावून गेले होते.त्यातले "जिंदगी एक सफर हैं सुहाना" व हैं ना बोलो बोलो" या दोन गाण्यांचे चित्रीकरण अजून आठवते.तो पर्यंत शम्मी कपूरचा एक ही सिनेमा पाहिलेला नसल्याने मला राजेश खन्नाच हिरो असावा असे वाटले होते.असो.
नंतरची माझी शम्मी कपूर यांची भेट राजेंद्र कुमार यांच्या सह पुण्यातील मंडईच्या रक्तदान शिबिरातील ! गर्दी खेचण्यासाठी संयोजकांनी या दोघांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.त्या वेळच्या त्यांच्या अवताराकडे पाहून मलाच मनातल्या मनात गलबलल्या सारखे झाले होते.
फोटो शोध सौजन्य - गुगल
सूचना - सदर लिखाण डॉ. दिलीप वाणी © कॉपीराईट आहे.




Comments