top of page

बापू घोडकेला धन्यवाद

  • Sep 20, 2021
  • 2 min read

माझ्या "रूद्राक्ष फार्म" या लेख मालिकेत लिहिलेली माझी खालील पोस्ट किती जणांना आठवते ? सध्या कुवेतमधे असलेल्या पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ.गवळीच्या फार्म हाऊसवर त्याच्या हट्टा खातर "रूद्राक्ष वृक्ष रोपण" केल्याचा व त्यावेळी "रूद्राक्ष" हे ज्या "भगवान शंकराचे अश्रू" आहेत त्यांनी "नागरूपा" त मला दर्शन दिल्याचा किस्सा सांगीतला होता.तो नास्तिकांना अर्थातच पटला नसेलच. पण आपला वर्गमित्र त्वचारोगतज्ञ बापू घोडके,नाशिक याला माझ्या भावना लक्षात आल्या व त्याने त्या अनोळखी पॅथाॅलाॅजिस्टचा कसोशीने शोध घेतला.आज दुपारी बापूचा संदेश आला की तो अनोळखी पॅथाॅलाॅजिस्ट म्हणजे डाॅ.विजय गवळी व त्याने UK मधून रक्तपेढीविज्ञानातून MS केले असून त्याने चांडक सर्कल,नाशिक येथे रक्तपेढी व रक्तविकार संशोधन केंद्र सुरू केले आहे.बापू घोडकेने त्याचा नंबरही आवर्जून पाठवला.आपण केलेले "रूद्राक्ष

वृक्षारोपण" कितपत यशस्वी झाले आहे या उत्सुकतेपोटी मी जराशा साशंक मनानेच डाॅ.विजय गवळींना फोन केला. आयुष्यात फक्त एकदाच व तो ही काही वर्षांपूर्वी भेटलेला हा पॅथाॅलाॅजिस्ट आपल्याला ओळखेल की नाही याची काळजी देखील वाटत होती.


आता काय झाले ते लक्षपूर्वक ऐका.डाॅ.विजय गवळी म्हणाले "वाणी सर ! मी तुम्हाला "गुरूस्थानी" मानतो.तुमचे "रूद्राक्षा" वरचे पुस्तक वाचल्या पासून मी काही ही करून तुमची भेट घ्यायचीच हे ठरविले होते.त्यासाठी "रूद्राक्षा" चे रोप देखील खरेदी करून त्याचे "संगोपन" चालू केले होते. त्याचे "प्रतिरोपण" तुमच्याच हस्ते माझ्या फार्म हाऊसवर करायचा मी "चंग" बांधलेला होता.जनकल्याण रक्तपेढी, नाशिक कडून तुम्ही वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे कळाले व मी ती "सुवर्णसंधी" साधली.आता तो "रूद्राक्ष वृक्ष" चांगलाच मोठा झाला आहे.मी सध्या "कुवेत" ला असतो,पण आक्टोबर महिन्यात नाशिकला येणार आहे. तेव्हा तुम्ही माझ्या फार्म हाऊसवर आलेच पाहिजे. थोड्याच दिवसात तुमच्या "रूद्राक्ष वृक्ष" चा फोटो पाठवितो."


त्याच्या या संदेशामुळे माझ्या मनात लगेच खालील सुभाषित आले:-


’शिष्यात इच्छेत पराजयम’ !

(आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे कि त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव

( शिकविण्यात यशस्वी ठरल्यामुळे )करावा अशी इच्छा बाळगणारा तो खरा गुरु.)


डाॅ.विजय गवळी यांनी हे "सुवचन" खरे करून दाखववल्या बद्दल व त्यांचा शोध लावून दिल्याबद्दल बापू घोडके यांना मन:पूर्वक धन्यवाद !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page