भोंडल्याची गाणी व थॅलेसिमियामुक्ती
- dileepbw
- Aug 21, 2021
- 1 min read
"भोंडल्याची गाणी व थॅलेसेमियामुक्ती"
शांताराम गोसावीच्या "भोंडल्याची गाणी" या पोस्टमुळे मी माझ्या समाजात राबवलेला एक जनजागृतीचा उपक्रम आठवला.तो तुम्हाला सांगतो.
लाड सका(शाखीय) वाणी समाजात प्राबल्याने आढळणार्या "थॅलेसिमिया" या अनुवांशिक रक्त विकाराबाबत "भुलाबाई/गुलाबाई" या कुलदेवता पूजनाच्या "भोंडला" या धार्मिक कार्यक्रमात समस्त महिलांनी जनजागृती केल्यास लाड सका (शाखीय) वाणी समाज "थॅलेसेमियामुक्त समाज" होण्यास वेळ लागणार नाही.
त्यासाठी उपवधू-वरांची "Thalassaemia screenig Test" ही रक्त तपासणी करून ती सकारात्मक आल्यास त्यांना परस्परांशी विवाह करण्यापासून परावृत्त केले पाहिजे.अशांनी ज्यांची तपासणी नकारात्मक आहे अशांशीच विवाह करावा.ही नम्र विनंती.
हा अत्यंत महत्वाचा वैद्यकीय संदेश "भोंडल्याची १६ गाणी " या लोकगीतांमध्ये गुंफण्याचा अवश्य प्रयत्न करावा.अशी सोळा गाणी या अभ्यासगटात प्रसृत केली आहेत.
भोंडला,भुलाई,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत.घरातल्या मोठ्या व्यक्ती,आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती.परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती व गाणी सारे काही विरून जाते आहे.
अशा या दुर्मिळ लोकगीतांमधे "थॅलेसेमियामुक्ती" सारखे अनेक आधुनिक संदेश गुंफता येतील.ते तरुण वर्गाला निश्चित आवडेल व त्याचा मोठा सामाजिक उपयोग ही करून घेता येईल.लाड सका (शाखीय) वाणी समाजातील कवयत्रींनी त्यावर अवश्य विचार करावा व आपल्या कर्तृत्वाचा रंग दाखवावा.ही नम्र विनंती.
अशी परंपरा जपणारी पण आधुनिक संदेश देणारी गाणी आपल्या स्मार्ट वहीमध्ये अर्थात आपल्या "स्मार्टफोन" मध्ये अवश्य जपून ठेवावी व योग्य प्रसंगी त्याचा वापर करावा.ही नम्र विनंती.
आपली मैत्रीण गावाकडची असो की शहरातील,सर्वांनीच जपावा असा हा अनमोल ठेवा ! लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते.त्यामुळे आपल्या आई,बहीण, जावा,मैत्रिणी सगळ्यांनाच सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" !
या आवाहनाला प्रतिसाद मिळालेली एक चांगली कविता सोबत पाठवित आहे.सर्वांनी ती अवश्य वाचावी.ही नम्र विनंती.




Comments