"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग १९"
- Sep 6, 2023
- 1 min read
"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग १९"
मणिपूर संघर्षामागचे "वंशशास्त्र व धर्मशास्त्र" तुम्हाला समजावून सांगीतले.या लेखमालेत हजारो वर्षांपूर्वी त्याचा बिमोड कसा करण्यात आला ते व आता या पुढे बिमोड कसा काय करता येईल त्याबद्दल सांगतो.ऐका.
"मणिपूर संघर्ष" मिटवण्यात आमची मदत हवी आहे का ? अशी विचारणा अमेरिकेने भारताकडे केल्याचे कळताच माझी दीर्घकालीन शंका बळावली.मुळात या "मणिपूर संघर्ष" चे "बीजारोपण" केले कोणी ? "नार्थ अमेरिकन चर्च" या संघटनेनेच ना ? त्यांना चीन,भारत,बांगलादेश,मॅनमार व पाकिस्तान यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी ईशान्य भारतात एक "ख्रिश्चन राज्य(?राष्ट्र)" हवेच आहे.त्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी तेथे अमाप "धन" ओतलेले आहे.मिशनर्यांच्या स्वरूपात हजारो ख्रिस्त्यांचे "तन" झिजवलेले आहे.त्यामुळे "नार्थ अमेरिकन चर्च" चे "मन" मणिपूरमधे गुंतलेले आहे.
आपल्याला हे समजायला हवे.ज्या ज्या वेळी आपले धर्माकडे दुर्लक्ष झाले त्या त्या वेळी इतिहासाने भारताला मोठी "चपराक" मारलेली आहे."मणिपूर संघर्ष" हा काही वेगळा नाही.हा "चर्च विरूध्द मंदिर" असा संघर्ष आहे. त्यामुळे "महिलांची धिंड" यापेक्षा "भारताचे धिंडवडे" मला अधिक महत्वाचे वाटतात.
Comments