top of page

"राजकारणापलीकडची मैत्री

  • Aug 30, 2023
  • 1 min read

"राजकारणापलीकडची मैत्री"

तीन व चार सप्टेंबरच्या सांध्यावर जन्मलेले खासदार व माजी मंत्री कै.मा.श्री.गिरीष बापट मी यांच्या जन्मवर्षात जेमतेम पाच वर्षांचे अंतर ! तर जन्मवेळेत जेमतेम काही तासांचा फरक ! त्यामुळे जनकल्याण रक्तपेढी,पुणेचे संस्थापक कै.मा.प.य. वैद्य(खडीवाले) यांनी आमचा जन्मदिन संयुक्तपणे साजरा करण्याचा घाट घातला व त्या दिवशी जनकल्याण रक्तपेढी पाहुण्यांनी गजबजून उठली.

तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा वाढदिवस होता.मी ४८ वर्षांचा असतानाच मला काहीही कल्पना न देताच त्यादिवशी माझा "पन्नासावा वाढदिवस" साजरा करण्यात आला व तो आयुष्यभर माझ्या "चेष्टेचा विषय" ठरला.माझे जवळचे मित्र त्यानंतरचा माझा प्रत्येक वाढदिवस हा "कितवा पन्नासावा वाढदिवस" अशी विचारणा करूनच साजरा करू लागले.तो अगदी आजतागायत !

जनकल्याण रक्तपेढी,पुणे ज्या वर्षी स्थापन झाली त्याच वर्षी कै.मा.श्री.गिरीष बापट पुणे म.न.पा.मधे "नगरसेवक" म्हणून निवडून आले व क्रमाक्रमाने स्थायी समितीचे अध्यक्ष,सलग पाच वेळा आमदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभेत प्रतोद,कॅबिनेट मंत्री व शेवटी खासदार म्हणून कार्यरत होते.रक्तपेढीविज्ञान क्षेत्रात माझी देखील अशीच क्रमाक्रमाने वृध्दी होत गेली. रक्तपेढीविज्ञानाच्या राष्ट्रीय संघटनेचा पुणे शहर अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष,मुख्य संपादक ते राष्ट्रीय सचिव अशी माझी देखील पदोन्नती होत गेली.आमच्या दोघांच्या या वर्धिष्णू कार्याला कै.मा. प.य. वैद्य(खडीवाले) यांचा सदोदीत सर्वप्रकारचा "वरदहस्त" असे.त्यामुळे हे "संयुक्त वाढदिवसा" चे प्रयोजन !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page