top of page

लाख मोलाचा एक रूपया

Aug 3, 2021
2 min read

"लाख मोलाचा एक रूपया"


नमस्कार वर्गमित्रांनो,


जनकल्याण रक्तपेढी परिवाराची कोकणातील "महाड"

रक्तपेढी व संपूर्ण महाड शहर गेले काही दिवस १७ फुट पाण्याखाली बुडालेले होते.हळूहळू संपर्क व्यवस्था, दळण-वळण व वीज पुरवठा पूर्वपदावर येत आहे. "जनकल्याण रक्तपेढी,महाड" ही संपूर्ण कोकणासाठी कार्य करणारी रक्तपेढी असल्याने माणगाव व खेड येथील उपकेंद्रे देखील बंद पडलेली आहेत.ही सर्व पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची व शुभेच्छांची आवश्यकता आहे.काही दिवसांपूर्वीच "अक्षयतृतीये" च्या मुहुर्तावर नव्याने सुरू झालेली Blood Component Laboratory देखील त्वरीत कार्यरत करावी लागणार आहे.त्यासाठी तातडीने रू.साठ लाख निधीची आवश्यकता भासेल. जनकल्याण रक्तपेढी परिवाराने त्यासाठी कंबर कसलेलीच आहे. महाराष्ट्रातील सर्व १३ शाखा सहाय्य करतीलच ! पण आपण ही आपला "खारीचा वाटा" उचलावा.हे विनम्र आवाहन !


जनकल्याण रक्तपेढी परिवार हा लोकांचा,लोकांनी, लोकांसाठी चालविलेला मानवतेचा वैद्यकीय सामाजिक उपक्रम असून त्याचे "भरण-पोषण" समाजालाच करावे लागणार आहे.आपण सर्वजण या समाजाचेच एक घटक आहात. त्यामुळे ही "सामाजिक जबाबदारी" उचण्यात आपण मागे राहू नये.हे विनम्र आवाहन !


कोकणातील "जनकल्याण रक्तपेढी,महाड" च्या बँक खात्याची माहिती पाठवित आहे.ज्या न्यासाच्या माध्यमातून या रक्तपेढीचे संचालन केले जाते त्यांच्या नावाने आपण आपली मदत पाठवावी.त्याची माहिती खालील प्रमाणे :-


१.नाव - कै.काकासाहेब चितळे स्मृती केंद्र

२.सेव्हिंग खाते क्र. १२१५१०१००००७७०१

३.IFSC Code - BKID0001215

४.बँक - बँक आॅफ इंडिया,महाड शाखा


परदेशस्थांसाठी FCRA A/c ची माहिती देखील पाठवित आहे. आपण परकीय चलनात देखील "जनकल्याण रक्तपेढी,महाड" ला मदत करू शकता.


A/c Name - Rashtriya Swayamsevak Sangh Jankalyan Samiti (Maharashtra Prant)


A/c No.- 40168273559

(FCRA Savings Account)


IFSC - SBIN0000691


SWIFT - SBININBB104


Address - FCRA Cell, 4th Floor, State Bank of India, New Delhi Main Branch,

11 Sansad Marg, New Delhi - 110001.


आपल्या "फुल ना फुलाच्या पाकळी" ची अपेक्षा आहे. धन्यवाद !


आपला पॅन नंबर तसेच मदतीचा "स्नॅप शाॅट" मला अवश्य पाठवा.आपल्याला 80 G चा लाभ मिळावा यासाठी पावती पाठवताना तो आवश्यक आहे.त्यासाठी आपला सध्याचा पत्ता देखील अवश्य पाठवा.


रक्तपेढी हे जात,पात,पंथ,धर्म,राजकारण या सर्वांच्या पलीकडे जाऊन केले जाणारे दैवी पेक्षा जास्त असे "मानवतेचे वैश्विक कार्य" आहे हे आपण सर्वजण जाणताच. त्यामुळे सर्वप्रकारची वैचारिक मतभिन्नता बाजूला ठेवून हे "मानवतेचे समाजकार्य" पुढे नेण्यासाठी आपण शुभाशिर्वाद द्यावेत.आपला या घडीचा "एक रूपया" देखील "लाख मोलाचा" आहे.


डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

राष्ट्रीय अध्यक्ष

जनकल्याण रक्तपेढी परीवार

भारत



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page