top of page

सायथियन लोकांची पूर्व इराणी भाषा

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल.

त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.

याला पुष्टी देणारे भाषाशास्त्रामधील संशोधन समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी अवश्य वाचावे व आपली "अहिराणी" ही मातृभाषा संस्कृत भाषेतून कशी जन्माला आली त्याचा इतिहास समजावून घ्यावा.ही नम्र विनंती.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज मध्य आशियात वास्तव्याला असताना

"Scytho-Sarmatian" या गटातील भाषा बोलत असत. इराण देशाच्या पूर्व भागाला त्यावेळी "सायथिया" या नावाने ओळखत असत.या प्रांताचा विस्तार पश्चिमेला तराई खोर्‍यापासून ते पूर्वेला पार युरोपपर्यंत पसरला होता.यामध्ये प्रामुख्याने शेती करून जगणार्‍या लोकांच्या टोळ्यांची वसती होती. ते इंडो-युरोपियन गटातील विशेषत: इराणियन गटातील भाषा बोलत असत.या तत्कालिन भाषांचे वर्गीकरण भाषातज्ञ खालील प्रमाणे करतात :-

१.इंडो-युरोपियन

२.इंडो-इराणियन

३.इराणियन

४.इस्टर्न इराणियन

५.सायथियन

६.वेस्टर्न अलानियन

७.सायथो-खोतानीज

८.ओसेशियन

९.ओसेटिक

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज "सायथियन" ही "पूर्व इराणी" भाषा बोलत असत.Alexander Lubotsky या भाषातज्ञाने सायथियन भाषेचे दोन गटात वर्गीकरण केले आहे.मध्य आशियाच्या पूर्वेकडे बोलली जाणारी ही "प्राचीन सायथियन" तर पश्चिमेकडील अर्वाचिन

सायथियन". सध्या मध्य आशियात बोलल्या जाणार्‍या "वाखी/Wakhi" या भाषेत या "सायथियन" भाषेचा अंश आढळून येतो.उदा.कॉकेशस पर्वताचे नाव सायथियन भाषेतील क्राॅय(बर्फ)+खासीस (चमकणे) या धातूंपासून तयार झाले असून त्यामुळे सायथियन भाषेत "कॉकेशस" म्हणजे "बर्फामुळे चमकणारा पर्वत" असा होतो.

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेले लाड सका (शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज ही "सायथियन" भाषा बोलता बोलता कधी संस्कृत-प्राकृत- अहिराणी-मराठी बोलू लागले हा मोठा अभ्यासाचा विषय आहे.

या प्रश्नाचे उत्तर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुल, कुलग्राम,कुलनाम यांच्या अभ्यासात दडलेले आहे.त्यासाठी या समाजाच्या धार्मिक संकल्पना, सामाजिक चालीरिती,कुलाचार या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page