top of page

सारजा-बारजा माता

  • dileepbw
  • Nov 8, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित केलेली माहिती सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे :-

बहाळ ता.चाळीसगांव हे गांव गिरणा नदीच्या काठी वसलेले सुपीक असे ऐतीहासीक गांव आहे.लाड सका(शाखीय) वाणी समाजातील थोर संत श्री.पांडूरंग महाराज बहाळकर हे मुळचे बहाळ येथील "ब्राम्हणकार" परिवारातील ! पूर्वी "सारजा बारजा माते" च्या मूर्त्या गावा बाहेरील जुन्या गढीवरील मंदिरात होत्या.संतश्री पांडूरंग महाराजांच्या स्वप्नात मूर्त्या गेल्या व

आज्ञा केली की आम्हाला गावात स्थापन करा.त्यानुसार त्यांनी लिंबाच्या झाडाखाली मूर्त्यांची स्थापना केली.

१९५७ साली श्री.बेनिराम बारकू सोनजे व अन्य लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी गाववर्गणी गोळा करुन लाकडी मंदिर बांधले.त्यात मातांची व विठ्ठलाची स्थापना केली.

तद्नंतर २०१० मध्ये पुण्याचे कारागीर आणून नविन मंदिर बांधकाम करुन २/२/२०१२ रोजी पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली.

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" या कुलदेवतेचे मुळस्थान या समाजाच्या स्थलांतराच्या मार्गावरील पुढॊली ता.जि.चितोडगड हे असून त्या ठिकाणीही कुलस्वामिनी "लालाबाई-फुलाबाई" या नावाने ओळखली जाते.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी मुस्लिम आक्रमणांच्या काळात या गावाचे तत्कालिन ठाकूर यांनी वीरश्रीचे प्रतीक असलेल्या "भैरवा" ची स्थापना केली. तेव्हापासून या मंदिराचे संरक्षण व त्याची पूजाअर्चा ठाकूर समाज सांभाळत आहे.

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोनजे, नानकर, पाचपुते, ढोमणे, खानकरी, शिंदाडकर,या कुलांची कुलदेवता असलेल्या "सारजा-बारजा मातेला त्रिवार वंदन !

सध्या या मंदीराचे व्यवस्थापन न्यासामार्फत चालते.या न्यासाचे पदाधिकारी:-

अध्यक्ष - भाऊसो.संदिप पुंडलीक शिरुडे

विश्वस्त - श्री.पुना कोळी

मंदिराचे पुजारी-श्री.मधुकर गुरव

या न्यासाने लाड सका(शाखीय) वाणी समाज "थेलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकारापासून मुक्त करण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे. असे विनम्र आवाहन !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०१०)

Recent Posts

See All
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 
१६ कुलदेवतांचे स्तोत्र

"संस्कारवाणी,मुंबई" या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या सांस्कृतिक संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरीत केलेल्या "संस्कारधारा" या...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page