top of page

सुदामा-श्रीकृष्ण जोड्या

Aug 20, 2021
1 min read

BJMC मधील अनेक ज्ञात व अज्ञात "सुदामा-श्रीकृष्ण जोड्या"


वैयक्तिक संपर्कातून पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी "निधी संकलन" करताना BJMC मधील अनेक "अज्ञात सुदामा" व अनेक "अज्ञात श्रीकृष्ण" यांचा परीचय झाला. त्या सर्वांना त्रिवार वंदन !


अनेक श्रीकृष्णांनी या सुदाम्याच्या सांदीपनी रूषींच्या आश्रमातील काही स्मृती देखील जागविल्या.त्यामुळे आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर झाल्याचा मला आनंद मिळाला.माधुरी आपटेने जागृत केलेली रायचूर सरांची एक आठवण सर्वांना सांगतो.


आपल्या एका गॅदरिंगला "सुहाना सफर और ये मौसम हँसी" हे गाणे आँक्रेस्ट्रासह "संस्कृत" भाषेत ऐकवणारा प्रमोद जोग काही जणांना आठवतच असेल.नंतर तो बालरोगतज्ञ झाला.त्यावेळचा त्याचा हा त्याच्या बापासारखाच इरसाल "पुणेरी" किस्सा आहे.एकदा या पठ्ठ्याने बाप प्र.बा.जोग यांच्या सारखाच इरसाल टारगटपणा करून माधुरी आपटेची रात्रपाळी असताना CSF म्हणून चक्क "नळाचे पाणी" पाठविले. बालरोग विभागातून एका पाठोपठ एक "CSF" चा दणका सुरू झाला.त्यातच "डेड हाऊस" मधून "VVIP" calls सुरू झालेले.रक्तपेढीने बदली रक्तदाते मागताच पळून जाणारे सर्व नातेवाईक "डेड हाऊस" ला मात्र एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय जमा होतात हे मला अजूनही न उलगडलेले कोडे आहे.


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page