ओसवाल/ओस्तवाल वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
"जैन" धर्मातील तीर्थंकर "अजितनाथ(बनारस), पार्श्वनाथ(बनारस) व रिकबनाथ (धुलेवा, उधेपूर) यांचा(कृपया पुतळा पहा) पूजक असलेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज अनुवंशशास्त्रानुसार "दसा(बडे साजन) व बिसा(छोटे साजन)" अशा दोन गटात विभागला गेला आहे.
या विभाजनामागे असे क्षुल्लक कारण सांगण्यात येते की सुमारे ८०० वर्षांपूर्वी मारवाडातील एका खेड्यात "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजाच्या एका "जाती-भोजना" च्या वेळी नजरचुकीने "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजातील एका विधवेला व तिच्या पुत्राला "जाती-भोजना" चे आमंत्रण द्यायचे राहून गेले. त्याचा राग येउन त्या विधवेने आम्ही तुमच्या सर्वांपेक्षा मोठे हे दाखविण्यासाठी "दसा उर्फ बडे साजन" असा "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजातील नवा उपगट सुरु केला.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments