जैन धर्मांतरण
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "सका/शक/Scythian" वंशाचा "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज "जैन" धर्मात कसा धर्मांतरित झाला याबाबत खालील आख्यायिका प्रसिद्ध आहे :-
राजस्थानातील "जोधपूर" जवळील "ओसिया/ओसानगर" येथील राजाला "ओसादेव" नावाच्या जैन मुनीच्या आशीर्वादाने "जयचंद" नावाचे अपत्य प्राप्त झाले."ओसिया/ओसानगर" च्या ग्रामदेवतेने "ओसिया/ओसानगर" येथील राजाला "जैन" धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला.त्यासाठी एक कापसाच्या पेळूचे सर्पात रुपांतर करण्यात आले.या सर्पाच्या दंशाने "जयचंद" मृत्यूमुखी पडला.त्याचे दहन करताना "ओसिया/ओसानगर" ची ग्रामदेवता तेथे अवतीर्ण झाली व तिने "ओसिया/ओसानगर" येथील राजाने "जैन" धर्म स्वीकारण्याच्या अटीवर "जयचंद" ला पुनर्जीवन दिले.
"जैन" धर्म स्वीकारल्यानंतर "ओसिया/ओसानगर" येथील राजाने "श्री श्रीमाळ" म्हणजे अत्यंत पवित्र हे नवीन गोत्र धारण केले. तर त्याची संपूर्ण प्रजा फक्त "श्रीमाळ" या गोत्राने ओळखली जाऊ लागली.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments