top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ६"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ६"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ५" या लेखात मी तुम्हाला करंदीकर मॅडमची पोलिस भरतीमधील तरूणांकडून झालेली फसवणूक सांगीतली.या लेखात मी अशा फसवणुकीतून व "कोर्टाच्या कचाट्यातून" कसा वाचलो तो किस्सा सांगतो.ऐका.

मध्यमवयीन पुरूषांची एक जोडी माझ्या लॅबमधे "सिमेन ॲनालिसिस" साठी आली."मनी चोरट्यांच्या का रे भीती चांदण्यांची" असे भाव दोघ्यांच्या मनात असल्याने ते त्यांच्या डोळ्यात देखील तरळत होते.सहसा "सिमेन ॲनालिसिस" साठी "पती-पत्नी" अशी "मेहुणाची जोडी" येत असते.येथे पुरूषांची जोडी" कशी ? मनाच्या अशा संभ्रमावस्थेतच त्यांना "सिमेन ॲनालिसिस" ची संपूर्ण माहिती,त्यासाठीची पूर्वतयारी व काळजी,तपासणीच्या मर्यादा इ.गोष्टी समजावून सांगीतल्या व त्यापैकी "वंध्यत्वाची समस्या" असलेल्या व्यक्तीला वीर्य संकलनासाठी बाथरुममधे पाठविले.सोबतच्या व्यक्तीला स्वागतकक्षात बसायला सांगीतले.

"संशय का मनी आला" म्हणत माझ्या रेफरिंग गायनॅक डाॅ.दिलीप घैसास यांना फोन केला.केस होती "एका लग्नाच्या तिसर्‍या गोष्टी" ची ! आधीच्या दोन पत्नी "वांझ" निघाल्या म्हणून या चिरंजीवांनी "तिसरे लग्न" केले होते.पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" ! आपणच "वांझ" असल्याची "अंदरकी बात" या चिरंजीवांनी आधीच माहित असल्याने ते सोबत "मित्र(Proxy)" घेऊन आले होते व त्यांना लढायला बाथरुममधे पाठवून हे "माझा अंत" माझ्याच स्वागतकक्षात बसून पहात होते.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page