top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १२"

  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १२"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

या लेखात माझ्या पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधे तपासायला आलेल्या विविध "गमती-जमती" सांगतो.तुमचे अनुभव पण सांगा.

एक अर्क पुणेरी पेंशनर "श्रीयुत गंगाधर टिपरे" या मराठी मालिकेमधल्या "दिलीप प्रभावळकर" सारखे कवळी चघळत चघळत लॅबमधे आले व विचारते झाले "शौच" तपासून मिळेल का ? मी "हो" म्हणताच पैसे किती ? नमुना कशातुन आणायचा ? किती आणायचा ? गरमागरम आणायचा का थंड चालेल ? अशा इत्यंभूत "पुणेरी चौकशा" करून गेले. दुसर्‍या दिवशी "नमुना" सादर झाला.

संध्याकाळी रिपोर्ट पाहून अनुनासिक स्वरात त्र्याग्याने उद्गारले

डाॅक्टर ! रिपोर्टवर नाव माझे कसे ?

मी म्हणालो तुम्हीच दिलात ना "नमुना" ?

हो ! पण तो "नमुना" माझा नाही.

कोणाचा ते तुम्ही ओळखायचे आहे.

रोज माझ्या दारात पडलेले असते.

तुमचा "रिपोर्ट" आला की पोलिस चौकीत जाणार होतो.

पण तुम्ही तर माझेच नाव टाकून मोकळे झालात !

असेच एक दुसरे "अर्क पुणेरी पेंशनर" बाटलीत चिकनच्या तुकड्यासारखे दिसणारे काही तरी घेऊन आले होते.त्यांना ती त्यांची उपटलेली "मुळव्याध" आहे का ? हे जाणून घ्यायचे होते.कुठून आणली ? असे विचारले तर रात्रभर दोरा बांधून ठेवला असे म्हणाले.आता बोला !

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page