"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १३"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १३"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
माझी अकरावी पनवेलची ! तेथील नगरपालिकेच्या रूग्णालयाचे डाॅक्टर श्री.केणी हे माझ्या तीर्थरूपांचे मित्र !त्यांची कन्या पुण्यात दिलेली.रहायला माझ्या लॅब शेजारीच !
तर सांगायची गम्मत अशी की हे डाॅक्टर श्री.केणी एकदा माझ्या लॅबमधे आले व इकडे तिकडे शोधक नजरेने पाहू लागले.शेवटी न रहावूनच मीच विचारले - काय शोधताय सर ? त्यांना मुलीची "प्रेगनन्सी टेस्ट" करून हवी होती व त्यासाठी ते माझ्याकडे "ॲनिमल हाऊस" आहे का ? ते शोधत होते. कशासाठी ?
त्यांना फिजिऑलाॅजीमधे शिकलेल्या प्राण्यांवर केल्या जाणार्या "अश्किम झोंडेक टेस्ट" व "ग्मेलिन टेस्ट" या सारख्या "प्रेगनन्सी टेस्ट" आठवत होत्या.मग मी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर Gravindex ही Latex Agglutination ची "प्रेगनन्सी टेस्ट" करून दाखवली.ते पाहून त्यांनी तोंडाचा जो "आ" वासला तो मी त्यात साखरेची चिमूट सोडल्यावरच बंद झाला.
त्या प्रसंगी मी थेट MD च्या परीक्षेत केलेले "प्राण्यांवरील जादूचे प्रयोग" आठवले.रॅबिटच्या कानाची नस पकडून त्यातून रक्त काढणे,माऊसच्या पोटात Intra-peritoneal injection देणे,चावा न घेऊ देता रॅटच्या शेपटीतील व्हेनमधे I/v देणे असे उद्योग किती जणांनी केले आहेत ?




Comments