"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २४"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २४"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !
माझ्या लॅबमधील पुढचे "ऑटोमेशन" झाले ते हिमॅटाॅलाॅजीचे ! "Coulter" ची "Three part cell counter" ही त्यावेळी सगळ्यांचीच "सपनोंकी रानी" होती.
"मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू ?" असे म्हणत सगळेच तिची आशाळभूतासारखे वाट पहात होते.बायोकेमेस्ट्रीच्या ऑटोमेशनच्या पुर्वानुभवामुळे आता सगळे शहाणे झाले होते.
नववधूसाठी स्वतंत्र बेडरुम,उबदार ब्लॅंकेट,नक्षीदार पिलो कव्हर्स अशी या "सपनोंकी रानी" च्या स्वागताची तयारी सर्वांनी आधीच करून ठेवली.त्यामुळे "हिमॅलटाॅलाॅजी ऑटोमेशन" फारसे त्रासदायक ठरले नाही.पण कुठूनही
कशीही भाकरी(Keishmn's stain) आणा,ती गोडच मानून घेणारी "हिमॅलटाॅलाॅजी" या "सपनोंकी रानी" च्या आगमनामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत फारच "चोखंदळपणा" करू लागली.
रोजच्या जेवणात स्वस्तातली भाकरी(Leishman's stain) नको ! माझ्या माहेरचीच "रूमाल रोटी(Cell Counter Reagents)" हवी ! असा हट्ट धरून बसली. बरं ही "रूमाल रोटी" भारतीय पैशात तरी मिळावी की नाही ? डाॅलरची किंमत बदलली की हिची किंमत बदलायची.त्यामुळे सतत "खिसा गरम" राहील याची काळजी घ्यावी लागायची.




Comments