"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २९"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २९"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! प्रधानसर व तत्सम पॅथॉलॉजीस्ट सोडून सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे ते !
बायोकेमेस्ट्री व हिमॅटाॅलाॅजीचे "ऑटोमेशन" केल्यानंतर आता कशाचे बरे "ऑटोमेशन" करावे ? अशा विवंचनेत असतानाच
"Histopathology" चे काय करता येईल याचा विचार सुरू केला.
IHC च्या किमती पाहून हे काही आपल्या खिशाला परवडेल असे प्रकरण नाही हे लगेच लक्षात आले.मग CRI, Mumbai चे संचालक डाॅ.पी.जी.सहस्त्रबुध्दे यांचे Cancermimetic Antigen हे संशोधन वाचून त्याचा पाठपुरावा केला."गाय छाप" जर्दावाले श्री.शैलेश मालपाणी यांचे प्रबोधन करून "नाकोडा" या नावाची एक कंपनी तयार केली.ELISA Platform वापरून Cancermimetic Antigen शोधायची पध्दत शोधून काढली.टाटा रूग्णालय, मुंबई पासून सुरूवात करून त्याचा देशभर प्रचार व प्रसार केला.त्याचे माझ्या पत्नीला दोन पैसे मिळाले.पण मी कफल्लक तो कफल्लक !
मग त्याचा नाद सोडून मी FNAC शिकायचे ठरविले. त्यासाठी काय केले हे सांगण्याआधी माझा इंटर्नशिपमधला किस्सा सांगतो.तो ऐका.
जळगावच्या इंटर्नशिपचा पहिलाच दिवस ! सिव्हिल सर्जन डाॅ.चिकोडी OT मधे शिरले.आम्ही "शिकाऊ" नजरेने सर्व काही न्याहाळत होतो.टिपत होतो.सरांनी स्वत:च सर्जिकल टाॅवेलला क्लिप्स लावायला सुरूवात केली.बोलता बोलता "रनिंग काॅमेंट्री" चालू होती.हे मी माझ्या OT Assistant कडून शिकलो.आता तुम्ही शिका.मी एकदम भारावून गेलो. कुणाही कडून काहीही शिकण्यात कमीपणा वाटू नये हा आयुष्यातला सर्वात "मोठा धडा" इंटर्नशिपच्या पहिल्याच दिवशी शिकलो तो आजही विसरलेलो नाही.




Comments