अयांशचा Café au lait spot
- dileepbw
- Jul 30, 2021
- 1 min read
(Café au lait spots" are well circumscribed, evenly pigmented macules and patches seen in healthy children and associated with syndromes, commonly neurofibromatosis type I.)
"Peau d’orange(Orange Peel) Skin" सारखाच "Café au lait spots" हा नादमाधुर्य असलेला शब्द मी पहिल्यांदा पेडियॅट्रिक्सच्या सौ.मृदुला फडके मॅडमकडून शिकलो.असे "coffee with milk (coffee with usually hot milk in about equal parts.)" सारख्या रंगाचे डाग असलेले एक बाळ मला त्यांनी दाखविले व विचारले या बाळाला काय झाले आहे ? मी म्हणालो "जन्मखूण" आहे ती ! त्यावर त्या हसल्या व आपल्या स्वत:च्या तळहातावरची "सिमियन क्रीज" दाखवून म्हणाल्या हे काय आहे ? ते मी बरोबर सांगीतले.मग त्या म्हणाल्या हे "मतीमंद(डाऊन्स सिंड्रोम)" असल्याचे लक्षण असू शकते.त्यांच्याकडे पाहून मी म्हणालो "तुमच्याकडे पाहून तर असे वाटत नाही"! मग खुदकन हसून म्हणाल्या ही "जन्मखूण" देखील अशीच आहे बरं बाळा ! ती neurofibromatosis या विकाराचे लक्षण असू शकते.हे कायम लक्षात ठेव.त्यावर मी उत्तरलो
मला पण आहे अशी "जन्मखूण"! मला कुठे neurofibromatosis आहे ?
माझ्या सारखाच एक "Café au lait spot" माझा युके मधील नातू अयांश याच्या पाठी वर पण आहे.या "Café au lait spot" ने त्याच्या आई-बापाच्या तोंडाला UK च्या National Health Scheme(NHS) ने कसा फेस आणला ते ऐकण्यासारखे आहे.
एकदा शाळेत शिक्षकांनी सर्व मुलांना चित्रे काढायला सांगीतली.अयांशने काढलेले रडणार्या मुलाचे चित्र पाहून शिक्षकाने त्याला सरळ NHS च्या समुपदेशकाच्या ताब्यात दिले.त्याने हा "Café au lait spot" पाहून सरळ प्रश्न केला - "आई-बाप बदडतात का रे तुला ?" या गाढवाने खरे ते सांगतले आणि NHS ची समुपदेशक मंडळी पोहोचली ना चौकशीसाठी घरी ! मग काय ? शेजारी-पाजारी,मित्र-मैत्रिणी सगळ्यांचीच "सखोल" चौकशी झाली.NHS च्या skin specialist ने देखील तो "Café au lait spot" तपासला.महिनाभर हे "ड्रील" चालले होते.आम्हाला भारतात देखील याचा "मनस्ताप" झाला.
असा हा "Café au lait spot" चा प्रताप !




Comments