top of page

तीर्थरुपांचे व्यवसायांतर

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रात एकदा "जात" लागली की ती जाता जात नाही.

ज्या व्यवसायामुळे जात समजते तो व्यवसायच बदलण्याची वेळ आता आली आहे का ?

शेती,व्यापार व सावकारी हे लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे पारंपारिक व्यवसाय !

माझे तीर्थरूप श्री.बाळकृष्ण महादेव वाणी यांनी हे पारंपारिक व्यवसाय सोडून स्वातंत्र्यपूर्व काळात "वाघिणीचे दूध" प्याले.

चाळीसगावच्या ए.बी.हायस्कूल मधून ब्रिटिश पद्घतीचे शिक्षण घेतले व शालांत परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविला.

घरची परिस्थिती बेताची असताना देखील शिक्षकांच्या आग्रहाखातर पुण्याला जाऊन स.प.महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले.पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.

पारंपारिक व्यवसायात गुरफटून न पडता उच्च शिक्षणाची कास धरणार्‍या माझ्या या दूरदृष्टी पित्यास,त्यांना योग्य मार्गदर्शन करणार्‍या गुरूवर्य श्री.ल.नी.छापेकर सरांना व पोटाला चिमटा काढून मुलाला शिकविणार्‍या श्री.महादेव गणपत वाणी या माझ्या आजोबांना त्रिवार सलाम !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६५६७)

Recent Posts

See All
कुलम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 
तीर्थरूपांना आदरांजली

" माझे तीर्थरूप कै.प्राचार्य बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) निवृत्त प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय(बी.एड.कॉलेज),पनवेल यांना...

 
 
 
माझे तीर्थरूप

इ.स.१८५० मध्ये "इंग्रजी शिक्षणा" त फक्त "ब्राह्मण" व अन्य बुद्धिजीवी जातींमधील व्यक्तीच रस घेत होत्या. अशा व्यक्ती अत्यंत हलाखीच्या...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page