तीर्थरूपांना आदरांजली
- dileepbw
- Sep 7, 2022
- 2 min read
" माझे तीर्थरूप कै.प्राचार्य बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) निवृत्त प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय(बी.एड.कॉलेज),पनवेल यांना विनम्र आदरांजली "
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास लिहिताना माझे तीर्थरूप कै.प्राचार्य बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) निवृत्त प्राचार्य,शासकीय अध्यापक महाविद्यालय(बी.एड.कॉलेज),पनवेल यांचे पदोपदी स्मरण होते.
विशेषतः "संस्कृत" भाषेतील संदर्भ वाचताना त्यांच्या चिरंतन स्मृती पुन्हा पुन्हा जागृत होतात. काल एका समाज बांधवाने चक्क "संस्कृत" भाषेत संभाषण सुरु केले व मला आश्चर्याचा धक्का बसला.
माझे तीर्थरूप "संस्कृत" भाषेचे स्कॉलर ! शालांत परीक्षेत चाळीसगावच्या "आनंदीबाई बंकट माध्यमिक शाळा(अे.बी.हायस्कूल)" येथे "संस्कृत" भाषा हा विषय घेऊन सर्वप्रथम आलेले. पुढे पुण्यातील "सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून(एस.पी.कॉलेज)", "संस्कृत" भाषा हा विषय घेऊन पुणे विद्यापीठात "सर्व प्रथम" आलेले. त्यामुळे मला संस्कृत येत नाही याची खंत वाटू लागली.
याचे कारण शोधता असे लक्षात आले की तीर्थरुपांच्या बदल्यांमुळे आपले शिक्षण पश्चिम महाराष्ट्र(सातारा,कोल्हापूर),पुणे,विदर्भ(अमरावती,नांदेड),कोकण(रत्नागिरी,पनवेल) असे विविध ठिकाणी झाले.सर्वच शाळांमध्ये "संस्कृत" भाषा शिकविण्याची सोय न्हवती. त्यामुळे तीर्थरूप उन्हाळ्याच्या सुट्टीत घरच्या घरी जेवढे "संस्कृत" शिकवीत तेवढीच ही "देव वाणी(गीर्वाण भारती)" कानावर पडलेली. त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास लिहिताना ही त्रुटी पदोपदी जाणवते. आज माझे तीर्थरूप कै.प्राचार्य बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) हयात असते तर माझे हे इतिहास लेखनाचे काम अधिक सुकर झाले असते हे नि:संशय ! असो ! दैवगतीला पर्याय नाही.
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा इतिहास(History of Lad Saka Wani samaj)" या फेसबुकवरील अभ्यास गटात सहभागी झालेल्या सर्व लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांना मी असे विनम्र आवाहन करतो की आपण सर्वजण कै.प्राचार्य बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली अर्पण करू या व आपल्या इतिहास लेखनाच्या कामाला लागू या. हीच त्यांना खरी "श्रद्धांजली" ठरेल !
सोबत त्यांचा फोटो व त्यांच्या काही स्मृती(जेथे त्यांनी नाव लौकिक मिळविला त्या चाळीसगावच्या "आनंदीबाई बंकट माध्यमिक शाळा/अे.बी.हायस्कूल येथील स्मृतीचिन्ह व पुण्यातील "सर परशुरामभाऊ महाविद्यालयतू/एस.पी.कॉलेज" यांचे फोटो) समस्त लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवांच्या अवलोकनार्थ जोडत आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments