top of page

"एकविरा" माताजी या कुलदेवतेचे ऐतिहासिक कार्य

  • dileepbw
  • Sep 22, 2022
  • 1 min read

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाच्या "एकविरा" माताजी या कुलदेवतेचे ऐतिहासिक कार्य

मानवी समूह,त्यांचे व्यवसाय आणि त्यांच्या देवता यांच्या अन्योन्य संबंधातून "समूह संघटन" होत गेले. "सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलबांधवांना एकत्र आणण्यात,एकत्र ठेवण्यात,एकमेकांनी एकमेकांसाठी कार्य करावे म्हणून प्रेरणा देण्यात आणि "देव" कुलात "एकसंघता" वाढविण्यात "एकविरामाताजी" या कुलदेवतेने फार मोठे कार्य केले आहे.

दैनंदिन जीवनात ज्या निसर्ग शक्तींना महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले(उदा. सूर्य, चंद्र, भूमाता, नदी, अग्नी, उन, पाऊस, वृक्ष, प्राणी इ.) त्या सर्वच "देवता स्वरूप" झाल्या.

पुराणकाळात होऊन गेलेल्या पराक्रमी पुरुषांना(उदा. "देव" कुलाचे पुराण पुरुष कश्यप ऋषी) "देवत्व" प्राप्त झाले व त्यापैकी काही "कुलदेवता" देखील झाल्या. संस्कृतीच्या विकासक्रमात निसर्गवादाकडून(उदा. निसर्गपूजन - "देव" कुलाचे मध्य आशियातील अग्नीपूजन) मानवाचे पाऊल जसे पुढे पडू लागले व "अमूर्त विचारां" ना महत्वपूर्ण स्थान प्राप्त होऊन धर्म,पंथ(उदा. भारतात स्थलांतरित झाल्यानंतर "देव" कुलाने स्वीकारलेला वैष्णव पंथ),संप्रदाय अस्तित्वात येऊ लागले, तसे कुलदेवतेचे मूळ स्वरूप(उदा. "देव" कुलाचे मध्य आशियातील "अग्नी" पूजन भारतात स्थलांतरित झाल्यानंतर "विष्णू" पूजन झाले) बदलत गेले.

एका समूहाची देवता हळू हळू इतर समूहांकडूनही स्वीकारली जाऊ लागली. भारतासारख्या देशात,विशेषतः उच्च वर्णीयांच्या देवतांचा स्वीकार करून वर्ण आणि जाती व्यवस्थेतील आपले स्थान कसे उंचावत येईल याचा देखील प्रयत्न झाला. "सका/शक/Scythian" वंशाचे लोक(पूर्वी "आर्य" म्हणून ओळखले जाणारे) व "ऑस्ट्रलोइड (Australoid)" वंशाचे लोक(पूर्वी "अनार्य" म्हणून ओळखले जाणारे) यांच्या सतत संपर्कातून एकमेकांनी एकमेकांच्या देवता स्वीकारल्या. त्यांचे स्वरूप बदलत गेले.

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाने सुद्धा "ऑस्ट्रलोइड(Australoid)" वंशाच्या लोकांच्या(पूर्वी "अनार्य" म्हणून ओळखले जाणारे) कित्येक प्रथा स्वीकारल्या आहेत. "देव" कुलातील "अग्नी" पूजन व "विष्णू" पूजन या सोडून अन्य प्रथांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास यातील सत्यता लगेच लक्षात येते.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page