कुलदेवता - रंगसूत्रांचे(Chromosomes) संच
- dileepbw
- Sep 7, 2022
- 1 min read
"एकविरादेवी नमोस्तुते !
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सोळा" कुलदेवता म्हणजे "सोळा" प्रकारच्या रंगसूत्रांचे(Chromosomes) संच असून त्यावर विविध प्रकारची जनुके(Genes) असतात.
या जनुकांमुळे त्या त्या व्यक्तीची शारिरीक जडण घडण ठरते.
या पैकी काही जनुके सदोष असल्यास "थॅलेसेमिया" हा अनुवांशिक रक्त विकार उद्भवू शकतो.
लाड सका(शाखीय) वाणी समाजात अशा व्यक्तींची संख्या सुमारे ५% असावी. त्यांनी परस्परांशी विवाह टाळल्यास लाड सका (शाखीय) वाणी समाज हा "थॅलेसेमियामुक्त समाज" होऊ शकतो.
त्यामुळे असे समाज बांधव शोधणे हे संपूर्ण लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे आद्य कर्तव्य आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलदेवतांचे भक्त विविध ठिकाणी विविध कारणास्तव एकत्र येत आहेत.सर्वांनी या प्रसंगी आपली "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करून घेणे समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या हिताचे ठरेल.
असाच एक "भक्ती संगम" कार्यक्रम लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "धुळे आणि वणी अंबोडे स्थित आई एकविरा" या कुलदेवतेच्या नामस्मरणार्थ "पौर्णिमा उत्सव" या निमीत्ताने दि. १६/१०/२०१६ रोजी "उत्कर्ष मंगल कार्यालय, सिडको,नाशिक येथे सायंकाळी ५ ते ८:३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
समस्त "एकविरा भक्तां" नी उत्सव आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा !
या शुभ प्रसंगी समस्त भक्तांनी वरील निर्णय घ्यावा.ही नम्र विनंती !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६८३३)




Comments