कुलस्वामिनी सेवा मंडळ
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या नाशिक येथील "श्री कुलस्वामिनी सेवा मंडळ" (अध्यक्ष- श्री. राम बेणीराम बधान, सचिव- श्री. देविदास सिनकर, छायाचित्रण - स्पीड लाईन ड्रीम मूवर्स,नाशिक) या संस्थेने वितरीत केलेला "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची राजस्थानातील कुलदैवते" या दोन चित्रफितींमधील माहितीनुसार,लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील काही प्रचलित कुलदैवतांची राजस्थानमधील मूळस्थाने सर्वांच्या माहितीसाठी कंसात देत आहे.
एकविरा माता - वणी (आसावरा/आवरा माता, मीनभेड, चितोडगड),
मनुमाता-आडगाव (झातला माता, पंडोली, चितोडगड),
सारजा-बारजा माता - बहाळ(लालबाई-फुलाबाई, पंडोली, चितोडगड),
मठांबा माता - बेटावद (कालिका माता, चितोडगड),
जोगेश्वरी माता- बेटावद(जोगनिया माता,बेगु,चितोडगड),
सुलाई माता-उन्टावद (धनोप,भिलवाडा),
आशापुरा माता-पाटण, शिंदखेडा,धुळे(शाकंभरी माता, सांबर, पर्वतसार, नागोर/आशापुरा माता,नंदोळ,पाली),
पेडकाई माता - चीमठाने,धुळे(ज्वाला माता, जोबनेर),
भवानी माता - वेलदे, निझर,सुरत(दधी माता, गोठमांगलोद, पर्वतसार, नागोर),
धनाई-पुनाई माता-साक्री,धुळे(कैवाई माता, किनसारीया, पर्वतसार, नागोर),
म्हाळसा माता- बेटावद, धुळे(मर्मी माता, राशमी, चितोडगड),
अन्नपूर्णा माता - कापडणे,धुळे(जयंती/जीन माता, दान्ता रामगड,सीकार)
प्रत्येक लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधवाने किमान आपल्या कुलदैवताची ऐतिहासिक माहिती दिल्यास संपूर्ण लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा स्थल व कालबद्ध इतिहास लिहिणे अवघड काम नाही.
आपला कृपाभिलाषी,
प्रा. डॉ. दिलीप बाळकृष्ण वाणी(देव, भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments