क्षत्रियाचे वैश्य
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "सका/शक/Scythian" वंशाचा, मूळचा "क्षत्रिय" वर्णाचा,लढवय्या असलेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज "वैश्य" वर्णात नंतर रुपांतरीत झाल्याचे त्यांच्या विवाह प्रथेत सुद्धा दिसून येते.
"ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजातील विवाह प्रसंगी कमरेला "तलवार" बांधून, डोक्यावर शिरपेच धारण करून व घोडीवर स्वार होऊन,आपल्या संपत्तीचे व सुबत्तेचे प्रदर्शन करणारे दागिने मिरवत वराचे लढवय्याच्या आवेशात विवाह मंडपात आगमन होते.
आल्या आल्या सर्व प्रथम तो विवाह मंडपाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या कडूनिम्बाच्या फांदीची म्हणजे प्रतीकात्मक शत्रूची आपल्या तलवारीने खांडोळी करतो व शत्रूचे शीर रुपी "नारळ" आपल्या कमरेला बांधून आपला पराक्रम सर्वांना दाखवीत विवाह मंडपात प्रवेश करतो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments